दापोली-जालगावमध्ये प्लास्टिक कचरामुक्त पर्यटनावर भर

दापोली-जालगावमध्ये प्लास्टिक कचरामुक्त पर्यटनावर भर

Published on

rat15p18.jpg
10794
ई-वेस्टपासून बनवलेले टी केबिन.
rat15p2.jpg
10757
दापोली ः पर्यटन संकुलात वापरलेल्या लाकडी वस्तू.
rat15p3.jpg
10758
सुशोभीकरणासाठी टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत.
----------
दापोलीतील जालगाव संकुलांनी घडवला कचरामुक्त पर्यटनाचा आदर्श
पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष कृतितून संदेश; प्लास्टिक ऐवजी स्टील भांडी, मातीचे माठ यावर भर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १५: कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीची ओळख आता येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि आल्हाददायक हवेसोबतच कचरामुक्त पर्यटन संकुलांसाठी देखील वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत पर्यटकांचा ओघ वाढलेल्या दापोली तालुक्यात, जालगाव येथील पर्यटन संकुलांनी कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ‘यूज अँड थ्रो’ वस्तूंना कायमचे टाळून स्टीलची भांडी, मातीचे माठ आणि टाकाऊ वस्तूंपासून सौंदर्यनिर्मितीवर भर दिला आहे. या द्वारे हसतखेळत पर्यावरण रक्षणाचा कृतित्मक संदेशही दिला आहे.
कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून दापोलीची ओळख आहे. दापोलीला पर्यटकांचा ओघ हा येथील थंड हवा आणि समुद्रकिनारे यांच्यामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. दापोली तालुक्यात आठ समुद्रकिनारे, दाभोळ आणि हर्णै बंदर यांसह जंगल पर्यटनाचाही आनंद घेता येतो. गेल्या दहा वर्षात दापोलीत येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटक जालगाव येथील आम्रपाली होम स्टे, वनश्री फार्म, गव्हे येथील निसर्ग सहवास या ठिकाणी कचरामुक्त पर्यटनाचा अनुभव घेत आहेत. येथील पर्यटन संकुलांमध्ये कचऱ्याचे सुनियंत्रित असे व्यवस्थापन पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. तेथे पाण्याची बाटली, प्लास्टिकचे स्ट्रॉ, कोणत्याही यूज अँड थ्रो वस्तूंचा वापर केला जात नाही. उलट अधिकाधिक शाश्वत पर्यावरण विकासाला अनुसरून टाकाऊ वस्तूंमधून निर्माण केलेल्या अनेक वस्तूंचा वापर केलेला आहे. येथील संकुलात नाश्ता देण्याकरिता किंवा जेवणाकरिता पर्यावरणपूरक अशा सुपारीपासून बनवलेल्या प्लेट्स किंवा आवर्जून स्टीलच्या डीश व ताटे यांचाच वापर केला जातो. त्यासाठी आवर्जून चिनीमातीच्या कपांचाच वापर करण्यात आला आहे. पाणी पिण्यासाठी थंडगार माठ आणि स्टीलचे ग्लास, स्टील जार किंवा स्टीलच्या बाटल्यांचा वापर केला जातो.
संकुलांमध्ये टाकाऊपासून सौंदर्यनिर्मितीचे उपक्रमही यशस्वी केले आहेत. कचऱ्याचा यथायोग्य वापर करून फ्लॉवरपॉट, बैठक व्यवस्था, हँगिंग, बेंचेस, फोटोसेशनसाठीचा सेल्फी पॉईंट किंवा टी कॉर्नर अशा गोष्टी केल्या आहेत. येथील पर्यटन संकुलांमध्ये ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करून त्याचा वापर बागेतील झाडांकरिता करण्यात येतो. पर्यटकांसोबत आणलेल्या काही प्लास्टिक रॅपर्स किंवा इतर वस्तूंकरिता स्वतंत्र डस्टबिन (कचराकुंडी) ठेवण्यात येऊन तो कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे थेट पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे.
या संकुलातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर पाठवण्यात येत नाही. या द्वारे दापोली तालुक्यातील ग्रामीण पर्यटनात वेगळा संदेश दिला गेला आहे. चहाकरिता चिनीमातीच्या कपबशांचा वापर आवर्जून होत असून, काही व्यावसायिकांनी पाणी पिण्याची युनिक संकल्पना राबवली आहे. त्यात प्रत्येक टेबलवर मातीचे माठ आणि स्टीलचे ग्लास ठेवले आहे. जालगाव परिसरातील पर्यावरणस्नेही होम स्टे आणि मंगल कार्यालयात येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांनी त्याचे अनुकरण आपापल्या घरी केलं तर पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

कोट
दापोली तालुक्यातील कचरामुक्त पर्यटनाचा आदर्श प्रत्येक नागरिकाने घेऊन आपापले घर कचरामुक्त कसे होईल, याकरिता प्रयत्नशील राहणं आणि त्याचा अंगीकार व प्रसार करणे, ही काळाची गरज आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, पर्यावरणस्नेही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com