आनंदव्हाळ हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम
१०८११
आनंदव्हाळ हनुमान मंदिर
परिसरात स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ''स्वच्छता ही सेवा-२०२५'' या उपक्रमाचे औचित्य साधून आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या वतीने श्री हनुमान मंदिर आनंदव्हाळ येथे भव्य स्वच्छता मोहीम लोकसहभागातून राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मंदिर परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत सरपंच रश्मी टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, ग्रामपंचायत अधिकारी एल. डी. सरमळकर, सदस्य अनिल सुकाळी, अभय सुकाळी, काशिनाथ परब, स्वानंद हळदणकर, चंद्रकांत घाटगे, रवींद्र टेंबुलकर, कर्मचारी विजय चव्हाण, केंद्रचालक प्रिशा बांदल, अवंतिका सांडव यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि गावाची स्वच्छता व सौंदर्य वाढवणे हा उद्देश होता. ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल ग्रामपंचायतीने आभार व्यक्त केले.

