-केरावळे केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात
-rat१५p१२.jpg-
२५O१०७८४
राजापूर ः क्रीडा स्पर्धेतील कबड्डी सामन्यातील लक्षवेधी क्षण.
---
‘केरावळे’च्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः तालुक्यातील देवाचे गोठणे-केरावळे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच केरावळे येथे झाल्या. स्पर्धेत केंद्रशाळा केरावळे, सोलगाव नं. २ या शाळांनी सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला. सोलगाव नं. ३, देवाचे गोठणे नं. १, देवाचे गोठणे देऊळवाडी, हसळादेवी, केळंबेकरवाडी, घोडेपोई, सोडयेवाडी येथील शाळांनीही विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले.
केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धेचे उद्घाटन देवाचे गोठणेच्या सरपंच ज्योती सोगम यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रप्रमुख लक्ष्मण फाटक, ग्रामस्थ अविनाश नवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश नवाळे, लक्ष्मण नांगरेकर, साक्षी पोकळे, विशाखा बाणे, अमिषा नवाळे, ग्रामपंचायत सदस्य अनंत नवाळे, रूपाली करंगुटकर आदी उपस्थित होते.

