असनिये हायस्कूलचे
शुक्रवारी स्नेहसंमेलन

असनिये हायस्कूलचे शुक्रवारी स्नेहसंमेलन

Published on

असनिये हायस्कूलचे
शुक्रवारी स्नेहसंमेलन
ओटवणे ः धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक संचलित असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेसातला आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब, प्रमुख पाहुणे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, भाजप महिला जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, असनिये सरपंच रेश्मा सावंत, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, घारपी उपसरपंच स्वाती गावडे, कृषी सहाय्यक अधिकारी मिलिंद निकम, तिरोडा ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब, शालेय समिती सदस्य शिवराम गावडे, शांताराम सावंत, रामा गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री नऊला विद्यार्थ्यांचा ‘रंगबहार’ हा विविध कलागुणदर्शन कार्यक्रम होणार असून याचे उद्घाटन श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक एम. डी. सावंत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी केले आहे.
---
आंबा व्यवस्थापनाचे
तुळस ग्रामस्थांना धडे
वेंगुर्ले ः येथील कोकण कृषी विद्यापीठ दापोली संचलित प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे तुळस गावातील अनुसुचित जाती, जमातीतील ग्रामस्थांसाठी आंबा पिकाबाबत मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर ग्रामस्थांनीही आपल्या शंकांचे निरसन केले. हा कार्यक्रम तुळस येथील श्री देव जैतिराश्रित वाचनालयाच्या सभागृहात पार पडला. आंब्यासाठी किती अंतरावर लागवड करणे गरजेचे आहे, केमिकलचा वापर टाळणे, बुरशी, फळगळ, फुलकीड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर करा, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले. यावेळी रोगशास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर, तुळसच्या सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, सदस्य जयवंत तुळसकर, भीमराव तावरे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय आदी उपस्थित होते. ग्रामस्थांमधून कृष्णा तुळसकर, लवू तुळसकर, पोलिसपाटील प्रकाश तुळसकर यांच्यासह महिलांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देत ग्रामस्थांचे समाधान केले.
.......................
वेंगुर्ले वाचनालयातर्फे
पुरस्कारासाठी आवाहन
वेंगुर्ले ः नगर वाचनालय वेंगुर्ले या संस्थेतर्फे जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापार क्षेत्रात कार्यरत असणारे व जे वाचनालयाच्या वाटचालीत सहभागी (साहित्याचे वाचन करणे), साहित्य निर्मिती (कथा, कादंबरी, कविता, स्फुट लेखन) करणार्‍यांना यावर्षीही (कै.) लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी १ लाख रुपये कायम निधी संस्थेकडे ठेव म्हणून ठेवला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व ५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींनी आपले नावे, सभासद असलेल्या वाचनालयाचे नाव व प्रसिद्ध झाले असल्यास साहित्याची थोडक्यात माहिती असे प्रस्ताव नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेत २४ डिसेंबरपर्यंत आणून द्यावेत, असे आवाहन कार्याध्यक्ष सौदागर यांनी केले आहे.
........................
अणसूर येथे शिबिरात
३० जणांचे रक्तदान
वेंगुर्ले ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर येथे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत अणसूर यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ३० ग्रामस्थांनी रक्तदान केले. सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, सदस्य सीमा गावडे, सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे तसेच सुनील गावडे, मंगेश गावडे आणि रामचंद्र गावडे उपस्थित होते. रक्त संकलनाचे नियोजन एसएसपीएम ब्लड बँक यांच्यावतीने केले होते. अणसूर ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
---
मालवणात शुक्रवारी
कर्करोग चिकित्सा
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवारी (ता. १९) कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनच्या साहाय्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी केली जाणार आहे. सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com