गद्रे इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
10873
गद्रे इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
चिपळूण ः परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक विभागाच्या संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवातील स्पर्धा अलोरे येथे उत्साहात झाल्या. या स्पर्धेमध्ये सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन अलोरे येथील प्राथमिक विद्यालयात केले होते. महोत्सवातील स्पर्धांमध्ये वैयक्तीक व सांघिक क्रीडास्पर्धांचा सहभाग होता. सांघिक स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी व रिले तर वैयक्तीक स्पर्धांमध्ये १०० मी. धावणे, सॅक जम्प या क्रीडाप्रकारांचा समावेश केला होता. या स्पर्धांमध्ये सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलींच्या रिले या स्पर्धेमध्ये चौथीतील आर्वी मोरे, आरोही कांबळे, विविधा पुजारी आणि परी सोलंकी या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मुलांच्या रिले स्पर्धेत तिसरीतील शिवेश साळवी व ओंकार साळवी आणि चौथीतील देवांश घाडगे व अद्वैत रोठे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
-rat15p26.jpg-
स्वरा पांगळे
चतुरंगचा गोडबोले पुरस्कार स्वराला जाहीर
साखरपा ः येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्वरा पांगळे हिला चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी पुरस्कारासाठी स्वराची मुलाखत झाली. प्रतिष्ठानतर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येतात. कबनूरकर स्कूलतर्फे चार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रतिष्ठानकडे पाठवले होते. ५९ शाळांमधील २५४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींमधून निवड झालेल्या ३६ विद्यार्थ्यांची यादी संस्थेने जाहीर केली. कबनूरकर स्कूलच्या स्वराने बाजी मारली. तिला चित्रकलेची आवड आहे. प्रतिष्ठानतर्फे दिवाळीत दहावीच्या निवासी अभ्यासवर्गासाठीही तिची निवड झाली होती. तिने कराटेमध्येही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. इंग्लिश मॅरेथॉनमध्येही तिने बक्षीस मिळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

