कणकवली : साहित्‍य पुरस्कार

कणकवली : साहित्‍य पुरस्कार

Published on

फोटो :kan162.jpg
10985
मुंबईः गोरेगाव येथे नाटककार शफाअत खान, प्रेमानंद गज्वी, दीपक राज्याध्यक्ष, कवी अजय कांडर आणि अंजली ढमाळ यांच्या उपस्थितीत दीपतारांगण क्रिएशनच्या चित्रपट नाटक साहित्य पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री शुभांगी भुजबळ, कवी सायमन मार्टिन, सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना गौरविण्यात आले.

जे बोलायला पाहिजेत ते बोलतच नाहीत
शफाअत खान : तळकोकणातील रंगकर्मींतर्फे पुरस्कार वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ : आजूबाजूला काहीही घडू दे, मात्र लोकांनी एकत्र येत बोलत राहिलं पाहिजे. पण ज्यांनी बोलू नये ते वायफळ बडबडत आहेत आणि ज्यांनी बोलायला पाहिजे ते बोलतच नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी केले.
तळकोकणातील नाट्यकर्मी एकत्र येऊन स्थापन केलेल्‍या दीपतारांगण क्रिएशनतर्फे नाटक, चित्रपट, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना मुंबईतील गोरेगाव येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ज्‍येष्‍ठ नाटककार शफाअत खान बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अजय कांडर होते. तसेच मराठी भाषा विकास संस्थेच्या उपसंचालक तथा कवयित्री अंजली ढमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई गोरेगाव केशवराव गोरे स्मारक मध्ये हा कार्यक्रम झाला.
यावेळी अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांना पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार, कवी सायमन मार्टिन यांना लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना प्रा.गोपाळराव दुखंडे पुरस्कार शफाअत खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पुरस्कार सोहळ्याचे संयोजक नाटककार उदय जाधव आणि दीपा सावंत खोत त्याचबरोबर पुरस्काराचे परीक्षक नाटककार प्रेमानंद गज्वी,रंगकर्मी दीपक राजाध्यक्ष तसेच लेखक-दिग्दर्शक डॉ अनिल बांदीवडेकर, कवी दिनकर मनवर, लेखिका निर्मोही फडके, ज्येष्ठ पत्रकार संजय परब, श्रीमती दुखंडे आणि परिवार, अभिनेता कवी अक्षय क्षींपी, टाटा इंस्टूटूटच्या माया बार्शीगे, रविकिरणचे अनिल सावंत, लेखक दिग्दर्शक प्रकाश पवार, प्रिया पवार, अभिनेता नीलेश भेरे तसेच देवानंपिय असोक नाटकातील कलाकार किरण मोरे, आदित्य शिर्के, मधुकर कांबळे, महादेव जाधव, अक्षय तायडे आदी उपस्थित होते.
अजय कांडर म्हणाले, ज्या लेखक- कलावंत यांच्याकडून आपण अपेक्षा बाळगत आहोत त्यांच्याकडून काही अपेक्षाच बाळगू नये अशी परिस्थिती आहे. अशाच काळात जो लेखक कलावंत अस्वस्थ आहे, त्यांनी एकत्र येत चांगलं काम करत राहिलं पाहिजे. म्हणूनच दीपतारांगण क्रिएशनच्या माध्यमातून नाटक चित्रपट साहित्य यासंदर्भातील एक नव सांस्कृतिक काम मुंबईत सुरू करण्यात आले आहे.
अंजली ढमाळ म्हणाल्या, लेखणी आणि कला याची जबाबदारी सत्य दाखविणे आहे. या सत्याचा वसा पेलण्यासाठी काही महत्वाच्या क्वालिटीजची आवश्यकता असते; जी कलाकार, साहित्यिक म्हणून आवश्यक आहे आणि त्यासाठी भेदांच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून उभ राहिले पाहिजे.
यावेळी पुरस्कार विजेते शुभांगी भुजबळ, सायमन मार्टिन मधुकर मातोंडकर यांनीही विचार व्यक्त केले. दीपा सावंत खोत यांनी सूत्रसंचालन केले. उदय जाधव यांनी स्वागत केले. निलेश भरे यांनी आभार  मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com