-फिनोलेक्सच्या ११ विद्यार्थ्यांची मॅक्सवेल कंपनीत निवड

-फिनोलेक्सच्या ११ विद्यार्थ्यांची मॅक्सवेल कंपनीत निवड

Published on

फिनोलेक्सच्या ११ विद्यार्थ्यांची
मॅक्सवेल कंपनीत निवड
रत्नागिरी, ता. १६ ः फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ११ विद्यार्थ्यांची मॅक्सवेल टेक्नॉलॉजीज् (व्हेक्टरे ग्रुप) या प्रसिद्ध कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २०२६ला उत्तीर्ण होणाऱ्या बॅचचे विशाल गुप्ता, सानिका कदम, मयूरी माने, नामदेव पायनाईक, कामिनी पवार, साईश साटम, अनिरुद्ध सावंत, अथर्व शिवणेकर, साहिल ठाकूरदेसाई, यश खेर तसेच २०२५ बॅचचा राहुल कांबळे यांचा समावेश आहे.
मॅक्सवेल टेक्नॉलॉजीज् ही व्हेक्टरेअंतर्गत कार्यरत कंपनी असून, कॅड ऑटोमेशन सोल्युशन्स, ड्रॉफ्टिंग किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मार्केटिंग अँड डिझाईन सर्व्हिसेस, एस्टिमेशन अँड ऑडिट सर्व्हिसेस यांसारख्या क्षेत्रांत जागतिक स्तरावर सेवा पुरवते. या कंपनीने भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॉवरप्लांट, विमानतळ, शैक्षणिक संस्था आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com