अॅड. डिंगणकर यांचा सत्कार

अॅड. डिंगणकर यांचा सत्कार

Published on

rat१४p१०.jpg-
P२५O१०५६९
रत्नागिरी : ज्येष्ठ वकील फजल डिंगणकर यांचा सन्मान करताना रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे. डावीकडून अॅड. शाल्मली आंबुलकर, अॅड. रफिका डिंगणकर, अॅड. अवधूत कळंबटे.
----
अॅड. फजल डिंगणकर यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील फजल डिंगणकर यांनी वकिली व्यवसायास ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे त्यांचा सन्मान अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी नुकताच केला.
याप्रसंगी अॅड. पाटणे म्हणाले की, साधा सरळ सज्जन माणूस ॲड. फजल यांनी गेली पन्नास वर्ष यशस्वी वकिली केली. मोकळा स्वभाव, हसरा चेहरा लाभलेल्या फजल यांनी आपल्या सुस्वभावी कौशल्य यातून आपले समृद्ध व्यक्तिमत्त्व विकसित केले. त्यांच्या उपस्थितीने आमच्या बारचा सन्मान वाढला आहे. या वेळी ॲड. रफीका डिंगणकर यांनी ॲड. फजल यांची मेहनत, सरळ स्वभाव यांचे कौतुक केले. ॲड. अवधूत कळंबटे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ज्येष्ठ वकील प्रदीप परुळेकर, ॲड. विजय साखळकर, ॲड. राजशेखर मलुष्टे, ॲड. दिलीप धारिया, ॲड. शाल्मली आंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com