कुडाळात ७ जानेवारीपासूनबाबा वर्दम नाट्य महोत्सव
कुडाळात ७ जानेवारीपासून
बाबा वर्दम नाट्य महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः बाबा वर्दम थिएटर्स आयोजित (कै.) बाबा वर्दम नाट्य महोत्सव ७ ते १३ जानेवारी या कालावधीत बाबा वर्दम स्मृती रंगमंच, कुडाळ येथे दररोज सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. महोत्सवाचे हे २८ वे वर्ष आहे.
यावर्षी राज्यभरातील नामवंत संघांची ७ उत्तम नाटके या नाट्यमहोत्सवात सादर होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन ७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. गेल्या २७ वर्षात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या स्पर्धेत आपली नाटके सादर केली आहेत. यावर्षीही पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील नामवंत संघांची नाटके पाहण्याची सुवर्णसंधी रसिकांना प्राप्त झाली आहे. सर्व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वर्षा वैद्य यांनी केले आहे. नाट्य महोत्सवात ७ जानेवारीला तपस्या सावंतवाडी निर्मित ''संगीत होनाजी बाळा'' (लेखक चि. य. मराठे, दिग्दर्शक अभय मुळये), ८ ला मन्वंतर कला अकादमी मुंबई निर्मित ''कोणाच्या खांद्यावर'' (लेखक डॉ. वासुदेव विष्णुपुरीकर, दिग्दर्शक चिंतू वालकर), ९ ला स्नेह पुणे निर्मित ''देवी'' (लेखक व दिग्दर्शक योगेश सोमण), बाबा वर्दम कुडाळ निर्मित ''वन सेकंदस लाईफ'' (लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक साहिल देसाई, शोण घुर्ये, १० ला आमचे आम्ही पुणे निर्मित ''एकेक पान गळावया'' (लेखक डॉ. समीर मोने, दिग्दर्शक युसुफ अली शेख), ११ ला अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली निर्मित ''दिनकर पुरोहितचा खून'' (लेखक चं. प्र. देशपांडे, दिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक), १२ ला जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन संचलित, आनंद रंग कोल्हापूर निर्मित ''भांडा सौख्य भरे'' (लेखक व दिग्दर्शक विपुल देशमुख), १३ ला वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली निर्मित ''साठा उत्तराची कहाणी'' (लेखक विक्रम भागवत, दिग्दर्शक (कै.) रघुनाथ कदम, सुहास वरुणकर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

