चिपळुणात एकाच दिवशी उभारणार ५०० बंधारे

चिपळुणात एकाच दिवशी उभारणार ५०० बंधारे

Published on

rat१६p२०.jpg-
O११०३८
चिपळूण ः तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेले बंधारे.
----------
चिपळुणात एकाच दिवशी
उभारणार ५०० बंधारे
जल व समृद्ध गाव संकल्पेतून नऊ पथके
चिपळूण, ता. १६ ः रत्नागिरी जिल्हा परिषद व चिपळूण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर मिशन बंधारे मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माजी वसुंधरा अभियानअंतर्गत जल व समृद्ध गाव या थीमवर तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीत एकाच दिवशी (१८ डिसेंबर) ५००हून अधिक बंधारे उभारण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, कृषी अधिकारी अभिजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली ही मिशन बंधारे मोहीम तालुक्यात राबवण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीत १८ डिसेंबरला एकाच दिवशी मिशन बंधारे मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी ९ जिल्हा परिषद गटात ९ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकाला पंचायत समितीतील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. या मोहिमेतून लोकसहभाग व श्रमदानातून विजय बंधारे, वनराई बंधारे व कच्चे बंधारे ५००हून जास्त उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यात कच्चे ८८, वनराई ३२ व विजय १३२ असे २५२ बंधारे पूर्णत्वास गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com