रूखी शाळेचे क्रीडास्पर्धेत यश

रूखी शाळेचे क्रीडास्पर्धेत यश

Published on

रूखी शाळेचे
क्रीडास्पर्धेत यश
गावतळेः दापोली तालुक्यातील फणसू केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा कोंढे नं. २ मध्ये झाल्या. स्पर्धेत रूखी शाळा सहभागी झाली होती. शाळेचा पट फक्त २६ असूनही या शाळेच्या खेळाडूंनी आपल्या खेळाची चुणूक दाखवून घववघवीत यश संपादन केले. लहान गटामध्ये ५० मी. धावणेत अनिष मांडवकरने द्वितीय, लहान गट मुलींमध्ये थाळीफेकमध्ये आर्या भागणेने प्रथम, ५० मी. धावणेत आराध्या भोसलेने द्वितीय, मोठा गटात मुलींमध्ये १०० मी. धावणेत, लांब उडीत स्वरा मांडवकरने प्रथम क्रमांक मिळवला. सांघिक खेळात लहान मुलांच्या गटात मुलगे खो-खो आणि कबड्डीत विजेते झाले. मोठा गट मुलींमध्ये लंगडी आणि खो-खोमध्ये उपविजेते झाले. क्रीडा स्पर्धेत सर्व क्रीडाप्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लहान गटात अनिष मांडवकर तर मोठ्या गटात स्वरा मांडवकर यांनी हा पुरस्कार मिळवून आपण खेळात सर्वोत्तम असल्याचे दाखवून दिले.
-------
तुळशी स्कूलची
पाचरळ येथे क्षेत्रभेट
मंडणगड ः न्यू इंग्लिश स्कूल तुळशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १० डिसेंबर रोजी पाचरळ येथील विजय प्रॉडक्ट्स या कंपनीला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कंपनीतील विविध यंत्रसामग्री, कच्च्या मालापासून तयार मालापर्यंतची प्रक्रिया, मशिनरीचा वापर तसेच प्रत्यक्ष उत्पादन कसे होते याची सविस्तर माहिती देण्यात आली. कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उत्पादन प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उद्योगजगताची प्रत्यक्ष माहिती मिळावी, प्रशासन, व्यवस्थापन व उत्पादन व्यवस्थेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, शिक्षक शिवाजी सोनवणे, टी. एस. खंदारे, सुरेश कोतवाल, कैलास धाडवे, संदेश पारधी उपस्थित होते.
-----
rat16p11.jpg-
10999
डॉ. पी. एस. मेश्राम

डॉ. मेश्राम यांना
ग्लोबल टीचर अॅवॉर्ड
राजापूरः तालुक्यातील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांना महिला सशक्तीकरण संघ, नागपूर यांच्यातर्फे ‘ग्लोबल टीचर अॅवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. ते मनोहर हरी खापणे महाविद्यालयात गेली २५ वर्ष इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या महिला विकासकक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी मुलींना मोफत एसटी पास, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वसंरक्षणाचे ट्रेनिंग, ब्युटीपार्लर कोर्स असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. मुंबई विद्यापिठाचे ते गाईड असून, त्यांच्याकडे पाच विद्यार्थी पीएचडी करत आहेत. त्यांची पुस्तके विविध विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन महिला सशक्तीकरण संघातर्फे त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संस्थाध्यक्ष मनोहर खापणे, उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, सरचिटणीस नरेश पाचलकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com