‘कॅशबुक’प्रकरणी बरेगारांचे उपोषण

‘कॅशबुक’प्रकरणी बरेगारांचे उपोषण

Published on

11108

‘कॅशबुक’प्रकरणी बरेगारांचे उपोषण

माणगाव वन विभाग वीजप्रश्न; सावंतवाडीत ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः सावंतवाडी वनविभागाच्या माणगाव येथील इमारतीच्या वीज जोडणीशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी कागदपत्र (कॅशबुक) गहाळ झाल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगर यांनी सोमवार (ता.१५) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करूनही वन विभागाने आठ महिने उलटूनही कॅशबुक उपलब्ध केले नाही किंवा पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. यामुळे व्यथित होऊन बरेगर यांनी हे पाऊल उचलले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचे उपोषण सुरू असताना लेखी आश्वासन मिळाल्याने १५ दिवसांसाठी उपोषण स्थगित केले आहे, असे बरेगार यांनी सांगितले.
बरेगर यांनी २५ एप्रिलला उपवनसंरक्षक, सावंतवाडी वन विभाग यांच्याकडे यासंबंधी तक्रार अर्ज दिला होता. माणगाव येथील वन विभागाच्या इमारतीच्या विद्युत पुरवठ्यासाठी २७ जुलै १९८१ ला विद्युत मंडळाकडे १८ हजार १८५ ची सुरक्षा ठेव भरणा केली होती, जी रक्कम संबंधित कार्यालयाच्या कॅशबुकमध्ये दर्शविली जाणे अपेक्षित होते. बरेगर यांनी माहिती अधिकारातून त्या कॅशबुकची प्रत वनक्षेत्रपाल, कुडाळ आणि सावंतवाडी यांच्याकडे मागितली असता, वनक्षेत्रपाल, सावंतवाडी यांनी ते कॅशबुक ‘आढळ होत नाही’ असे लेखी उत्तर दिले.
गहाळ कॅशबुक हे कायमस्वरूपी जतन करण्याचे आवश्यक कागदपत्र असून, ते सांभाळणे हे संबंधित कर्मचाऱ्यांचे शासकीय कर्तव्य होते. असे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ होणे हा महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट, २००५ चा थेट भंग असल्याचे बरेगर यांचे म्हणणे आहे. ​बरेगर यांनी उपवनसंरक्षकांकडे मागणी केली होती, की कागदपत्रे गहाळ झाल्याबद्दलची जबाबदारी निश्चित करून, ते परत मिळविण्यासाठी व संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तातडीने पोलिसांत तक्रार द्यावी. अशी कारवाई न झाल्यास, पंधरा दिवसांनंतर तक्रार दाखल करू, असेही त्यांनी कळविले होते. ​या तक्रारीला सुमारे आठ महिने झाले, तरी उपवनसंरक्षक कार्यालयाकडून गहाळ कॅशबुक उपलब्ध केले नाही अथवा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. यामुळे नाईलाजाने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
---
वन विभागाकडून शोध मोहीम
​काल दिवसभरात उपोषणस्थळी वनक्षेत्रपाल पोहोचले होते. उपोषण सुरू झाल्यानंतर वन विभागाकडून गहाळ कॅशबुक शोधण्याचा प्रयत्नही सुरू होता. कॅशबुक त्वरित मिळत नसेल, तर किमान विभागाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशी मागणी बरेगर यांनी केली आहे. काल रात्री उशिरापर्यंत त्यांचे उपोषण सुरू असताना उशिरा लेखी आश्वासन मिळाल्याने १५ दिवसांसाठी उपोषण स्थगित केल्याचे बरेगरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com