सार्थक कोतापकरचे व्यक्तीचित्र राष्ट्रीय पातळीवर प्रथम
-rat१६p२८.jpg-
२५O१११११
लांजा ः मॅकचे संचालक प्रीतेश ठीक यांच्या हस्ते लांजा हायस्कूल येथे सार्थक कोतापकर याचा शिल्ड, प्रमाणपत्र आणि मोबाईल देऊन गौरव करण्यात आला.
-rat१६p२९.jpg-
P२५O११११२
सार्थक कोतापकर याने रेखाटलेले चित्र.
------
सार्थक कोतापकरचे व्यक्तीचित्र राष्ट्रीय पातळीवर प्रथम
राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये यश ; ‘मॅक’तर्फे लांजा हायस्कूलमध्ये गौरव
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १६ ः मास्टर आर्ट कॉम्पिटिशन (मॅक) या संस्थेतर्फे देशपातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत (स्केच ड्रॉइंग) लांजा हायस्कूलच्या सार्थक कोतापकरने रेखाटलेल्या सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या व्यक्तिचित्राला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला.
याबद्दल मॅकचे संचालक प्रीतेश ठीक यांच्या हस्ते लांजा हायस्कूल येथे सार्थक कोतापकर याचा शिल्ड, प्रमाणपत्र, मोबाईल देऊन गौरव करण्यात आला. एज्युकेशन सोसायटी संस्थेला शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. मास्टर आर्ट कॉम्पिटिशन या संस्थेमार्फत देशपातळीवर स्केच ड्रॉइंग ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत भारतातील पाचशे ते ६०० शाळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई येथे ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीमधील विद्यार्थी सार्थक कोतापकर हा देखील सहभागी झाला होता. त्याने भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या रेखाटलेल्या व्यक्तिचित्राला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाला. संपूर्ण देशभरातून या स्पर्धेत एकच क्रमांक काढला जातो. त्यामध्ये सार्थकने प्रथम क्रमांक मिळवला.
या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय संस्थेलादेखील मॅक २०२५/२६ चे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मॅक संचालक प्रीतेश ठीक, मुख्याध्यापक सुनील पाटोळे, उपमुख्याध्यापक आजगावकर, वाय. एस. कोकणी, क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर, प्रसाद भाईशेट्ये, सार्थकची आई समृद्धी कोतापकर, वडील संजय कोतापकर, राजेश शिंदे, तानाजी आग्रे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
---
कोट
मला स्वप्नातही वाटले नव्हते मला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळेल; मात्र गुरुजन आणि आई-वडिलांच्या, मित्रमंडळीच्या आशीर्वादामुळे हा पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद होत आहे.
--सार्थक कोतापकर, लांजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

