अक्कलकोटमधून स्वामींच्या पादुका सावंतवाडी राजवाड्यात दर्शनासाठी
11115
अक्कलकोटमधून स्वामींच्या पादुका
सावंतवाडी राजवाड्यात दर्शनासाठी
सावंतवाडी ः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथील नरेश श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांना स्वतः प्रदान केलेल्या पावन चरणपादुकांचे दर्शन अक्कलकोट राजघराण्याकडून प्रथमच सावंतवाडीनगरीत भाविकांसाठी खुले करण्यात आले. या ऐतिहासिक दर्शन सोहळ्याचे आयोजन सावंतवाडी राजवाड्यातील दरबार हॉल येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी विधीवत पूजन करून चरणपादुकांचे दर्शन सर्वांसाठी खुले केले. स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही राजवाड्यात स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. याप्रसंगी अक्कलकोट संस्थानचे तिसरे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
---
11114
भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमांना भेट
सावंतवाडी ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या ‘सेवा-कार्यशिक्षण व कृतीद्वारे सामाजिक सशक्तीकरण’ या उपक्रमांतर्गत कुडाळ येथील जिव्हाळा आश्रम तसेच पणदूर येथील संविता आश्रमाला भेट दिली. हा उपक्रम नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीबीएसई बोर्डाच्या हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन’ या विषयांतर्गत राबविला जातो. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, सहानुभूती, संघभावना, स्वयंशिस्त व सामाजिक जबाबदारी हे गुण विकसित करण्यात येतात. आश्रम भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तेथील रहिवाशांशी संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन गरजा समजून घेतल्या आणि स्वच्छता, सेवा व मदतीच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. यावेळी उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, श्वेता खानोलकर, सचिन हरमलकर, संदीप पेडणेकर आदी शिक्षकवर्ग उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

