कशेडी बोगद्यात रॉक बोल्टिंग, तारेची जाळी
कशेडीत रॉक बोल्टिंग, तारेची जाळी
दरडीपासून संरक्षण; वाहतूक होणार सुरक्षित
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १६ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनामुळे वाहतूक खोळंबण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे बोगद्यात रॉक बोल्टिंग, तारेची जाळी बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील या अतिसंवेदनशील भागात दरड कोसळल्याने महामार्ग तासन्तास बंद पडत असल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक व मालवाहतुकीला मोठा फटका बसत होता. या पार्श्वभूमीवर भूस्खलनाचा धोका कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार, केंद्र शासनाने या कामाला प्राधान्य दिले आहे. उत्तराखंड येथील केंद्र शासनाची नामांकित संस्था तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) यांच्या माध्यमातून कशेडी बोगद्याच्या परिसरात डोंगरउतारांवर रॉकबोल्टिंग तसेच तारेची संरक्षक जाळी बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
या कामांत डोंगरकड्यांतील सैल खडक आणि माती विशेष तंत्रज्ञानाच्या साह्याने लोखंडी बोल्टद्वारे घट्ट बांधून ठेवण्यात येत आहेत. त्यावर मजबूत तारेची जाळी बसवण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीदरम्यान माती व दगड घसरून रस्त्यावर कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कशेडी बोगदा परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
गेल्या वर्षी कशेडी बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात डोंगरकपारीतून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या घटनेमुळे महामार्गावरील एक लेन अनेक तास बंद ठेवावी लागली होती. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. सध्या सुरू असलेल्या रॉक बोल्टिंग व संरक्षक जाळी बसवण्याच्या कामामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

