कट्टा हत्या प्रकरणी
सखोल तपास करा!

कट्टा हत्या प्रकरणी सखोल तपास करा!

Published on

कट्टा हत्या प्रकरणी
सखोल तपास करा!
मालवण : कट्टा गुरामवाडी येथील रोहिणी गुराम हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी वरची गुरामवाडी ग्रामस्थांनी अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्याकडे केली आहे. तसे त्यांना निवेदनही दिले. त्यात म्हटले आहे, की ‘रोहिणी रमेश गुराम यांची निर्घृण हत्या होऊन एक महिना लोटला आहे. मात्र, अद्याप खुनी सापडले नाहीत. तसेच हत्येचे कारणही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट आहे. तसेच त्यांचा मुलगाही भीतीच्या छायेत दिवस काढत आहे. भर दिवसा स्थानिक महिलेची हत्या करणारे आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना जेरबंद करावे व मृत रोहिणी गुराम व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा.’ यावेळी मंदार गुराम, अॅड. गीता काळे, महेश यादव, आनंद रावले व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
रेकोबा विद्यालयात
उद्या स्नेहसंमेलन
मालवण : वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात डॉ. रा. का. शिरोडकर यांची ७७ वी पुण्यतिथी आणि वार्षिक स्नेहसंमेलन १८ व १९ ला प्रशालेच्या शिक्षण महर्षी (कै.) एच. डी. गावकर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. १८ ला सकाळी ९ वाजता डॉ. शिरोडकर यांच्या पुतळ्याचे पूजन, चित्रकला प्रदर्शन उद्‍घाटन, विद्यार्थी मनोगत, हस्तलिखित प्रकाशन, मान्यवरांची मनोगते होणार आहेत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव स्वप्नीक फाटक, प्रमुख अतिथी म्हणून वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, देवली सरपंच शामसुंदर वाक्कर, शाळा समिती सदस्य चंद्रकांत चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित आदी उपस्थित राहणार आहेत. १९ ला दुपारी दोन पासून विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्‍घाटन वायरी भूतनाथ उपसरपंच प्राची माणगावकर व तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर यांच्या हस्ते होईल. उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा समिती अध्यक्ष संतोष गावकर, स्थानिक समिती अध्यक्ष दिलीप वाईरकर, मुख्याध्यापक संजय खोचरे, शालेय मंत्रिमंडळ पंतप्रधान वेद कुबल यांनी केले आहे.
-----------------
कांदळगाव कातवड येथे
आज धार्मिक कार्यक्रम
मालवण : कांदळगाव कातवड येथील श्री देव राष्ट्रोळी महापुरुष पार येथे त्रैवार्षिक श्री देव सत्यनारायणाची महापूजा उद्या (ता.१७) आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात महापुरुष पार येथे सकाळी ९ वाजता अभिषेक पूजन, दुपारी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, ग्रामस्थांची आरती,सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजन, रात्री ८ वाजता महाप्रसाद रात्री ९ वाजता आमने-सामने २०-२० डबलबारीचा जंगी सामना बुवा सुशांत जोईल, गुरुवर्य, अभिषेक शिरसाठ, दुर्वास गुरव, पखवाज तुषार शिंदे, तबला ओंकार लब्दे विरुद्ध बुवा वेंकटेश नर, गुरुवर्य प्रकाश पारकर, पखवाज भावेश लाड, तबला किर्तीराज जाईल, यांच्यात होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ब्राह्मण देव ग्रामस्थ मंडळ कातवडवाडी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com