कोकणातील उद्योगांपुढे बँकिंगच्या असहकार्याचे आव्हान

कोकणातील उद्योगांपुढे बँकिंगच्या असहकार्याचे आव्हान

Published on

उद्योगांपुढे बँकिंगच्या
असहकार्याचे आव्हान
धैर्यशील पाटील; राज्यसभेत मांडला महत्वाचा मुद्दा
रत्नागिरी, ता. १७ः कोकण परिसरातील औद्योगिक विकास, स्थानिक रोजगार निर्मिती आणि सातत्याने होत असलेले स्थलांतर या मुद्द्यांकडे खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत लक्ष वेधले. कोकणातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रासमोरील प्रत्यक्ष अडचणी मांडत विशेषतः बँकिंग सहकार्याच्या अभावामुळे स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडथळ्यांवर लक्ष केंद्रित केले.
राज्यसभेत मुद्दे मांडताना पाटील म्हणाले, एमएसएमई मंत्रालयाच्या योजना आणि धोरणात्मक चौकट सक्षम असून, मर्यादित संसाधनांमध्येही मंत्रालय रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे; मात्र कोकणसारख्या भागात बँकांकडून जुन्या ‘नकारात्मक अनुभवांचा’ आधार घेत कर्जपुरवठ्यात टाळाटाळ केली जात असल्याने नवउद्योजक पुढे येऊ शकत नाहीत. परिणामी, स्थानिक पातळीवर उद्योग उभे राहात नाहीत आणि रोजगाराच्या शोधात युवकांना मुंबई, पुणे व इतर महानगरांकडे स्थलांतर करावे लागत आहे.
सभागृहातील चर्चेतून कोकणातील स्थलांतराचे व्यापक सामाजिक चित्रही पुढे आले. औद्योगिक संधींच्या अभावामुळे रिकामी होत चाललेली गावे, कमी होत जाणारी स्थानिक आर्थिक हालचाल आणि रोजगारासाठी शहरांकडे जाणारी तरुणपिढी हे वास्तव या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. उद्योग, गुंतवणूक आणि वित्तपुरवठा उपलब्ध झाल्यास ही प्रवृत्ती उलटू शकते आणि गावाकडचा माणूस पुन्हा गावाकडे वळून कोकणातील गावे पुन्हा एकदा गजबजलेली, स्वयंपूर्ण आणि सशक्त होतील, असा आशय या चर्चेतून ठळकपणे पुढे आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com