‘एनएसएस’मुळे समाजसेवेची संधी
11289
‘एनएसएस’मुळे समाजसेवेची संधी
प्रफुल्ल वालावलकर ः नेरुरमध्ये श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत समाजात वावरत असताना तेथील लोकजीवन समजून घ्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या रुपाने निसर्गात, लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली असून तिचा लाभ घ्या. आजच्या पिढीमध्ये श्रमप्रतिष्ठा लोप पावत असताना अशा शिबिरांचे आयोजन हे उत्तम गोष्ट आहे. त्यात कोणतेही काम दुय्यम समजू नका, असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.
नेरुर येथे बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री. वालावलकर म्हणाले, "रुग्णसेवा म्हणजे परमेश्वर सेवा, अशी श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या नर्सेसना राष्ट्रीय सेवा योजना विभागातील शिबिरामार्फत समाजसेवा करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. त्याचा व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घ्या. तुमच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे, ते इतरांना द्या. मानवी सेवेसाठी जिवंत मन, वासल्य, प्रेम, समर्पण वृत्ती आवश्यक असते, ती आपल्यामध्ये विकसित करा. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सेवेचा परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा."
नेरुरच्या सरपंच भक्ती घाडीगावकर म्हणाल्या, "परमेश्वरभक्तीकडे जाण्याचा मार्ग समाजसेवेतून जातो. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामार्फत ही संधी आपणास उपलब्ध झालेली आहे. तिचा समाज संपर्कासाठी व आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वापर करा. त्यातून राष्ट्रसेवेमध्ये सहभाग नोंदवा." उमेश गाळवणकर यांनी, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे शिवधनुष्य उचलले आहे, असे सांगितले.
नेरुर उपसरपंच दत्ताराम म्हाडळकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. अरुण मर्गज, प्रा. नितीन बांबर्डेकर यानी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. वैजयंती नर, प्रा. शंकर माधव, प्रसाद कानडे, अक्षया सामंत आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पाटकर यांनी केले. उपस्थितांचे आभार अर्पिता घाडी हिने मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

