कळसुलीत बिबट्याने शेळी पळविली
11383
कळसुलीत बिबट्याने शेळी पळविली
भीतीचे वातावरण; कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
कणकवली, ता.१७ : कळसुली उत्तमनगर (ता. कणकवली) गावात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील शेतकरी विकास बाळकृष्ण दळवी यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यातून रात्री बिबट्याने शेळी पळवून नेऊन घनदाट जंगलात तिचा फडशा पाडल्याची घटना घडली. सदर शेळी दोन महिन्यांची गाभण असल्याची माहिती श्री. दळवी यांनी दिली.
कळसुली गावातील परिसरात रात्रीच्या वेळीस बिबट्याचा सतत वावर जाणवत असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच सचिन पारधीये यांच्यासह ग्रामस्थांनी केली. दरम्यान, कणकवली वनक्षेत्रपालांच्या मार्गदर्शनाखाली कळसुली येथे रात्रगस्त करण्यात आली. या गस्तीत वनपाल दिगवळे, वनरक्षक कळसुली, दिगवळे, नरडवे, जांभळगाव, जलद बचाव पथक,कळसुली गावचे सरपंच श्री. सचिन पारधीये, पोलीस पाटील हरिश्चंद्र गावकर, विकास दळवी, रणजित दळवी , संतोष मुरकर, बाळा भोगले उपस्थित होते.
---
ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन
यावेळी गावात बिबट्याचा मानव वस्तीत वावर असल्याबाबत केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने वनविभागातर्फे कळसुलीवासीयांना बिबट्याचा वावर आणि त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, दक्षता याबाबतची माहिती देण्यात आली. त्याबाबतची पत्रके वितरीत करण्यात आली. यावेळी वनअधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

