संगमेश्वर- सोळाशे खेळाडू करताहेत नियमित सराव

संगमेश्वर- सोळाशे खेळाडू करताहेत नियमित सराव

Published on

rat17p21.jpg-
11316
चिपळूण ः ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकूल आणि टाटा ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित विविध खेळांच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडू सहभागी झाले होते.

सोळाशे खेळाडू करताहेत नियमित सराव
ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्प; ज्ञानप्रबोधिनी व टाटा ट्रस्टचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ः ग्रामीण भागातील क्रीडाप्रतिभा ओळखून त्यांना संघटित प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकूल आणि टाटा ट्रस्ट यांच्यावतीने ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्रातील ४ केंद्रांवर हा उपक्रम सुरू असून, १६००हून अधिक खेळाडू नियमित सराव करत आहेत.
ग्रामीण स्तरावरून तंदुरूस्त आणि सक्षम खेळाडू घडवण्याचा प्रयत्न ट्रस्टद्वारे केला जात आहे. या प्रकल्पातील खेळाडूंसाठीची वार्षिक आंतरकेंद्रीय स्पर्धा ९ व १० डिसेंबर रोजी चिपळूण-डेरवण येथे बँक ऑफ महाराष्ट्र व मातृमंदिर विश्वस्त संस्था पुणे यांच्या सहकार्यामधून पार पडली. चार केंद्रांमधील निवडलेल्या ३००हून अधिक सर्वोत्तम खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्समध्ये १०० मी., १५०० मी. आणि गोळाफेक या क्रीडाप्रकारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्वांगीण कामगिरीच्या निकषावर चिपळूण केंद्र हे सर्वोत्कृष्ट केंद्र ठरले. या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना झालेल्या दुखापतींवर तत्काळ उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक दोन्ही दिवस उपस्थित होते.
या स्पर्धेच्या समारोपावेळी निवृत्त एअरमार्शल हेमंत भागवत, बी. के. एल. वालावलकर फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर एल., डॉ. नेताजी पाटील, टाटा ट्रस्ट्सच्या क्रीडा विभागप्रमुख नीलम बाबरदेसाई, डेरवण क्रीडा संकुल प्रमुख श्रीकांत पराडकर, क्रीडाकुलचे संस्थापक व प्रकल्प प्रमुख डॉ. मनोजराव देवळेकर, ज्ञानप्रबोधिनी चिपळूण केंद्रप्रमुख स्वानंद हिर्लेकर आदी उपस्थित होते. ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पाचे व्यवस्थापक संकल्प थोरात, आकाश कटले, क्रीडा मानसतज्ज्ञ आभा देशपांडे, तुषार कदम, विशाल सुर्वे यांच्यासह ३५ क्रीडा प्रशिक्षक व पंच सहभागी होते.

चौकट
ग्रामीण खेळाडू घडवण्याचा निर्धार
क्रीडा हे केवळ मौजमजेचे नाही तर राष्ट्रनिर्मितीचे साधन आहे. शिस्त, संघभावना, तंदुरूस्ती आणि नेतृत्वगुण क्रीडेमधून घडतात. जगातील अनेक राष्ट्रे आपल्या क्रीडा कामगिरीमुळे आघाडीवर आहेत. भारताने ऑलिंपिकसारख्या मंचावर अजूनही अपेक्षेइतकी कामगिरी केलेली नसली, तरी ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असे या प्रकल्पातून स्पष्ट दिसते. ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पामुळे अनेक गुणवंत खेळाडू घडत आहेत आणि भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू याच प्रकल्पातून पुढे येतील, असा विश्वास टाटा ट्रस्ट्सच्या क्रीडा विभागप्रमुख नीलम बाबर-देसाई यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com