राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त
Rat१७p१९.jpg
२५O११३११
मंडणगड: राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे भिंगळोली येथे झालेली वाहतूक कोंडी.
महामार्ग कामाचा सर्वसामान्यांना फटका
भिंगळोली, मंडणगड येथील चित्र; धूळ, कोंडीसह अपघातात वाढ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.१८ ः धुत्रोली, भिंगळोली तसेच मंडणगड शहर परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महामार्गाचे काम सुरू असतानाच बॉक्साईटची अवजड वाहतूक सुरू असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे काम धुत्रोली, भिंगळोली आणि मंडणगड या तीन गावांच्या हद्दीत वेगाने सुरू आहे; मात्र, महामार्गाच्या कामासाठी मुख्य रस्ता तोडून योग्य ठिकाणी डिव्हायडर न बसवता वाहतूक वळवण्यात आल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण व नवीन रस्त्यासाठी खडी पसरवण्याचे काम सुरू असल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हे अंतर मोठ्या रहदारीचे असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. धुळीचा त्रास टाळण्यासाठी किमान तीनवेळा पाणी मारणे अपेक्षित असताना अत्यल्प प्रमाणात पाणी मारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवाय, रस्त्यावर मारल्या जाणाऱ्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात प्रवेश करत असतानाही मंडणगड शहर परिसरातील कामाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची कामे तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी या निमित्ताने जोर धरत आहे.
----
चौकट
नवीन रस्त्याच्या कामावर लक्ष
दरवर्षीप्रमाणे यंदाही या दुरवस्थेतील रस्त्यावर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरू असून, धूळ व कोंडीचा त्रास अधिक तीव्र झाला आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार नवीन रस्त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत असताना म्हाप्रळ–शेनाळे रस्त्यावरील दुभाजक जोडण्याचे काम तसेच मंडणगड-पाचरळ मार्गावरील विविध कामांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

