2 दिवसाच्या बाळाच्या आतड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

2 दिवसाच्या बाळाच्या आतड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Published on

नवजात बाळाच्या आतड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
वालावलकर रुग्णालय ; पोटाचे दोन पदर चिकटल्यामुळे पोटात भरली हवा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ विभागाने शर्थीचे प्रयत्न करत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले. सातारा जिल्ह्यातील एका मातेच्या नवजात बाळाच्या बाबतीमध्ये घडले.
काही दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील कांबळे कुटुंबातील एक महिला वालावलकर रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली; परंतु प्रसूतीपूर्वी केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटाचे दोन पदर चिकटले दिसले आणि त्यामुळे पोटात हवा भरली आहे, असे निदर्शनात आले. याशिवाय प्रसूतीनंतर नंतर बाळाचे ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचं होते. यांची कल्पना नातेवाइकांना बालरोगतज्ज्ञ डॉ. कुरणे आणि डॉ. पार्वती हळबे यांनी कांबळे कुटुंबीयांना दिली होती. या बाळाची शस्त्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट होती शिवाय नवजात २.४४० किलो वजनाच्या बाळाला भूल देणेसुद्धा जिकिरीचे ठरणार होते. बाळाच्या आजाराचे निदान लवकरात लवकर करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील यांनी सीटी स्कॅन रिपोर्ट्स बालरोगसर्जन डॉ. धनंजय वझे यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे ठरवले.
पुण्यामधील बालरोगतज्ज्ञ शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. वझे हे तातडीची शस्त्रक्रिया असल्यामुळे पुण्याहून वालावलकर रुग्णालयात दाखल झाले व बाळाची शस्त्रक्रिया करून बाळाला जीवनदान दिले. भूलतज्ज्ञ डॉ. गौरव बाविस्कर, डॉ. प्रदीप पाटील, डॉक्टर हिमानी यांनी या दोन दिवसाच्या नवजात शिशूला भूल देऊन शस्रक्रिया सुखरूप पार पाडण्यात यश मिळवले. शस्त्रक्रियेनंतर या बाळाची काळजी घेणे अत्यंत जिकिरीचे होते; पण ती धुरा बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. कुरणे, डॉ. नताशा, पंक्ती, तनिषा, प्रतीक, स्वप्नील यांनी उचलली. शस्त्रक्रिया उत्कृष्ट झालीच परंतु शस्त्रक्रियेनंतर बाळाची योग्य ती काळजी NICU विभागातील सिस्टर वृषाली, सोनाली, श्रुतिका, जान्हवी, संपदा, निलम, शीतल, ऐश्वर्या, प्राची, आकांक्षा, ईशा, साक्षी यांनी घेतली तसेच बाळाची शस्त्रक्रिया व इतर पूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत केला गेला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com