घरडा हॉस्पिटलमध्ये नवीन डायलिसिस मशीन कार्यान्वित

घरडा हॉस्पिटलमध्ये नवीन डायलिसिस मशीन कार्यान्वित

Published on

- rat१८p५.jpg-
२५O११५२६
खेड ः घरडा हॉस्पिटलच्या डायलिसिस युनिटकडून घरडा केमिकलचे व्यवस्थापक रामचंद्र कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डावीकडून विनायक दळवी, गोपाल थंपी, विकास जाधव, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील आणि अन्य.
----
‘घरडा’त नवे डायलिसिस मशीन कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ : तालुक्यातील लवेल येथील रतनबाई घरडा हॉस्पिटलमधील डायलिसिस सेंटरसाठी घरडा केमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत नव्या डायलिसिस मशीन प्रदान करण्यात आल्या आहेत. या मशीनचे औपचारिक उद्‍घाटन घरडा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी रतनबाई घरडा हॉस्पिटलमधील डायलिसिस सेंटर हे खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. येथे अनेक गरजू रुग्णांना मोफत डायलिसिस उपचारांचा लाभ दिला जात आहे. याआधी डायलिसिससाठी रुग्णांना दूरच्या शहरांमध्ये जावे लागत होते. वेळ व खर्चाचा मोठा ताण सहन करावा लागत होता. मात्र घरडा हॉस्पिटलमध्ये मोफत डायलिसिस उपचार पद्धती उपलब्ध झाल्यामुळे या अडचणी दूर झाल्या आहेत. आता नव्याने डायलिसिस मशीन मिळाल्याने रुग्णाना वेळेत लाभ मिळत आहे. ही सुविधा रुग्णांना अत्यंत दिलासादायक ठरत आहे. मशीन प्रदान सोहळ्याला घरडा कंपनीच्या मुख्य कार्यालयातील विनायक दळवी, घरडा फाउंडेशनचे गोपाल थंपी, विकास जाधव, घरडा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य एस. के. पाटील, डॉक्टर फिरोज पटेल, घरडा सीएसआर विभागाचे श्री. बापूराव आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com