खल्वायनची संगीत सभा रंगतदार

खल्वायनची संगीत सभा रंगतदार

Published on

-rat१८p२.jpgः
P२५O११४९३
खल्वायन मासिक संगीत सभेत गायन सादर करताना सावनी शिखरे. सोबत संगीतसाथीला प्रथमेश शहाणे (तबला) अथर्व कुलकर्णी (हार्मोनियम)

सावनी शिखरेचा सुरेल आविष्कार
खल्वायनची संगीत सभा; शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः येथील खल्वायन या संस्थेची ३२० वी मासिक संगीत सभा १३ रोजी सायंकाळी सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात उत्साहात झाली. कै. विमलाबाई बळवंत लेले आणि कै. द्वारकानाथ सीताराम बाळ स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या संगीत सभेत पुण्याची उदयोन्मुख युवा गायिका सावनी शिखरे हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीतांच्या सादरीकरणाने रंगतदार झाली.
खल्वायनच्या या संगीत सभेची सुरुवात पुणे येथील किरण बापट यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली. प्रदीप तेंडुलकर यांनी कलाकारांची ओळख करून दिली. अध्यक्ष मनोहर जोशी यांचे हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला. मैफिलीची सुरुवात राग श्री मधील तिलवाडा तालात निबद्ध असलेल्या ‘वारी जाऊ रे’ या बडा ख्यालाने झाली. त्यानंतर तराणा व राग यमन मधील एक बंदिश झाली. विदुषी मंजुषा कुलकर्णी-पाटील, पंडित उल्हास कशाळकर व अन्य गुरूंकडून गायनाचे संस्कार झालेल्या सावनीने रागाची मांडणी आलाप, ताना याद्वारे चांगली केली. त्यानंतर तिने का धरिला परदेस, पद्मनाभा नारायणा, ज्या सुखा कारणे देव वेडावला, विष्णुमय जग, एकच रे मागणे व शेवटी अगा वैकुंठीच्या राया या भैरवीतील अभंगाने तिने मैफलीचा शेवट केला. सावनीच्या आवाजाला आस चांगली असल्यामुळे तिचे गायन कर्णमधुर झाले.
या कार्यक्रमाला साथसंगत संवादिनी - पुण्याचे प्रसिद्ध युवा वादक अथर्व कुलकर्णी व तबला वादक प्रथमेश शहाणे यांनी केली. हा यशस्वी करण्यासाठी र. ए. सोसायटी, गोदूताई जांभेकर विद्यालय, संजय बर्वे, दिलीप केळकर तसेच किरण बापट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com