रुग्ण, नातेवाईकांना दिले २४ हजार मोफत टिफीन

रुग्ण, नातेवाईकांना दिले २४ हजार मोफत टिफीन

Published on

-rat१८p९.jpg-
२५O११५५३
लांजा ः सचिन गुंड्ये यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
-------
काही सुखद---लोगो

रुग्ण, नातेवाइकांना २४ हजार मोफत ‘टिफीन’
सदिच्छा फाउंडेशनचा उपक्रम ; ‘केईएम’त येणाऱ्या कोकणावीसांची काळजी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १८ ः गेल्या तीन वर्षांपासून सदिच्छा फाउंडेशनच्या या संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र सचिन गुंड्ये यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना तीन वर्षांत २४ हजार मोफत टिफीन पुरवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सचिन गुंडये हे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकदा केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि आपल्या गावाकडील आणि विशेषता कोकणातील गोरगरीब जनतेची जेवण खाण्यापासून होणारी हेळसांड त्यांनी पाहिली होती. अशांसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी सुरुवातीला केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना स्वखर्चाने मोफत टिफिनची पुरवण्याचे काम सुरू केले. मात्र आपला काम धंदा, व्यवसाय सांभाळून या सर्व गोष्टी करणे सहज सोपे नव्हते. म्हणूनच त्यांनी सदिच्छा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
सदिच्छा फाउंडेशनच्या या कामात अध्यक्ष सचिन गुंड्ये यांच्यासह मनीष सावंत, स्वप्नश्री शिंदे, कांचन भोसले, प्रवीण साळुंखे, संतोष बावकर, महेश गुंड्ये, अजिंक्य नेमन, विक्रांत वारीशे, रूपेश बराम, राम वाडकर, संजय गुंड्ये, श्रुती खेडेकर, विजय गावडे, स्वप्नील घारे, विनिता कदम, महेश गावडे, जनार्दन गावडे, नेहा मालकर, प्रफुल राऊत, पुरुषोत्तम वेतकर, श्रेयस सावंत, दत्ता शिर्के, महेन्द्र आंग्रे, सुदिन सुवारे, संजय पालकर, प्रदीप कुंभार, संतोष चव्हाण, पप्पू गोरे, संजय खेतल, मंगेश तांबे, प्रवीण पतयान, दिनेश किणी, अमित शेलार, अंकुश मेस्त्री, संदेश गुरव, नीलेश सकपाळ, तरुण दास आदी अनेकांचे सहकार्य लाभत आहे. तसेच शिवसंग्राम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आनंद तरे, गीता तरे, तनुजा घरत, दिलीप तरे आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.
-------
चौकट
अनेकांचा मदतीसाठी पुढाकार
या संस्थेच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हळूहळू आपल्या या कामाचा व्याप वाढवला. सचिन गुंडये आणि सहकारी यांच्या हे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू असलेले काम लक्षात घेऊन आजवर अनेकजण आर्थिक मदतीसाठी पुढे येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com