असुर्डे विद्यालय राज्यस्तरावर
असुर्डे विद्यालयाची
राज्यस्तरावर निवड
चिपळूण : असुर्डे येथील वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालयाची भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग (SHVR) उपक्रमामध्ये जिल्ह्यातून राज्यस्तरावर निवड झाली. याबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यालयाने प्राप्त केलेल्या या देदीप्यमान यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडीक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष डी. ए. पाटील यांनी सहभागी सर्वांचे अभिनंदन केले.
कोंढे केंद्राच्या
क्रीडा स्पर्धा उत्साहात
चिपळूण : कोंढे केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा कळवंडे माडवाडी शाळेत उत्साहात झाल्या. स्पर्धेत कालुस्ते मराठवाडा, मिरजोळी, कोंढेमाळ, कळवंडे नाचरे, कळवंडे माडवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी लहान व मोठ्या गटात सहभाग नोंदवला. लंगडी, कबड्डी, खो-खो या सांघिक खेळांबरोबरच धावणे, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. कळवंडे माडवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना होमकर यांनी सर्वांचे स्वागत केले. केंद्रप्रमुख गर्जे यांनी शुभेच्छा दिल्या. माडवाडी शाळेच्या विद्यार्थी व बुलबुल पथकाने संचलन व मानवंदना दिली. सोनाली सहस्रबुद्धे यांनी क्रीडा शपथ दिली. खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी लायन्स क्लब चिपळूण गॅलॅक्सी प्रयास फाउंडेशन यांनी सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह दिले व सोनाली सहस्रबुद्धे यांनी वैयक्तिक स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक दिले.
गणपतीपुळे किनारी
सुरक्षा उपाययोजना करा
रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत समुद्रकिनारी सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर यांनी पर्यटन संचालनालयाचे संचालक बी. एन. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणपतीपुळ्यात वर्षाला अंदाजे ३० लाख पर्यटक येत असतात. पण श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्यामुळे समुद्रावर पोहण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे आतापर्यंत १५० ते २०० पर्यटकांचे बळी गेले आहेत व काही पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता गणपतीपुळे समुद्रकिनारी सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे समुद्रकिनारी तत्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी श्री. भाटलेकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

