डोंगरपाल मठामध्ये २८ ला स्नेहसंमेलन
डोंगरपाल मठामध्ये
२८ ला स्नेहसंमेलन
बांदाः सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ ट्रस्ट माडखोल व सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ ट्रस्ट कल्याण पश्चिम यांच्यावतीने सद्गुरू श्री नवनितानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित सर्व मठांचे अठरावे वार्षिक स्नेहसंमेलन २८ डिसेंबरला आयोजित केले आहे. हे स्नेहसंमेलन सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, डोंगरपाल-डिंगणे (ता. सावंतवाडी) येथे होणार आहे. या स्नेहसंमेलनास परमानंद महाराज व अवधुतानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सर्व मठांचे महाधिपती महाराज, संस्थापक, अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. पहाटे सर्व देवतांची पूजा, होम-हवन, भजन व कीर्तन, दुपारी १ ते ३ या वेळेत भंडारा (महाप्रसाद), सायंकाळी ४ वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन, स्वागत समारंभ, विविध मठांतील कलाकारांचे गुणदर्शन कार्यक्रम, सांगता समारंभ व भंडारा आयोजित करण्यात आला आहे. या स्नेहसंमेलनात कल्याण (प.), देवगड, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, लोकमान्यनगर, मोठा गाव, अलिबाग, मुरुड-जंजिरा आदी ठिकाणच्या स्वामी समर्थ मठांचा सहभाग राहणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
सिंधुदुर्गात
थंडीत घट
सावंतवाडीः जिल्ह्यात गेले आठ दिवस कडाक्याची थंडी पडत होती. तापमानाचा पारा सरासरी ९ अंशपर्यंत घसरला होता. यामुळे आंबा, काजू बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत होते. मात्र, मंगळवार (ता.१६) पासून थंडीचा कडका काहीसा कमी झाला आहे. सध्या तापमानाचा किमान पारा १९ अशांवर आहे.
......................
कणकवलीत २२ पासून
हरिनाम सप्ताह
कणकवलीः बेळगाव निवासी परमपूज्य आई कलावती देवी यांच्या शिकवणुकीप्रमाणे व श्रीहरी मंदिरातील भक्तमंडळींच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिर, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे हा सप्ताह होणार आहे. २२ ते २८ या कालावधीत सकाळी ७.३० ते ९ प्रातःस्मरण भजन व वाचन, सायंकाळी ४ ते ५.३० सायंस्मरण भजन व वाचन, रात्री ९ ते १०.३० विजयादशमी रात्रौस्मरण भजन व प्रदक्षिणा असे कार्यक्रम होणार आहेत. २८ ला सकाळी ७.३० ते ९ वाजता प्रातःस्मरण भजन व बाळगोपाळांसाठी बालोपासना होणार आहे. तरी सर्व भक्त व बालगोपाळांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धकला भजन मंडळ कणकवली यांनी केले आहे.
......................
रेडी येथे
२१ ला नाटक
वेंगुर्लेः रेडी-बोंबडोजीचीवाडी येथील दत्त निवारा येथे श्री स्वामी नृसिंहसरस्वती महाराज जन्मदिन उत्सव २१ ला होणार आहे. त्यानिमित्त सकाळी १० वाजता श्री सत्यदत्त पुजा, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून भजने, सायं. ७.३० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे ''असुरमर्दिनी'' हे नाटक होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
रेडीत २३ पासून
क्रिकेट स्पर्धा
वेंगुर्लेः होली क्रॉस युथ ग्रुप व क्रिकेट क्लब, रेडी आयोजित खुली पंचायत, नगरपालिका व गोवा येथील ''एक गाव-एक संघ'' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत रेडी होली क्रॉस मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे २६ वे वर्ष आहे. विजेत्या संघाला २५ हजार रुपये (आयएलपीएल रेडी माईन पुरस्कृत व जेरॉन फर्नांडिस पुरस्कृत चषक), उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये, चषक, मालिकावीरसाठी २००० रुपये, चषक, अंतिम सामन्यातील सामनादाराला १००० रुपये व चषक तसेच अन्य बक्षिसे आहेत. या ''एक गाव-एक संघ'' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
......................

