तुळसमध्ये १६८ जणांची नेत्र चिकित्सा

तुळसमध्ये १६८ जणांची नेत्र चिकित्सा

Published on

swt1814.jpg
11582
तुळस ः नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना सुजाता पडवळ. बाजूला डॉ. सचिन परुळकर, विवेक तिरोडकर, स्वराज पाटील व इतर मान्यवर.

तुळसमध्ये १६८ जणांची नेत्र चिकित्सा
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ः ‘मातोश्री’, ‘लोककल्प’, वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ः श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील १६८ नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराचे आयोजन शिबिर वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या सहकार्याने लोककल्प फाउंडेशन, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आणि मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे डॉ. सचिन परुळकर, विवेक तिरोडकर, स्वराज पाटील (सहाय्यक शाखा व्यवस्थापक), गौरी जुवेकर (सीएसआर सहाय्यक लोकमान्य बँक), दीपक पाटील (अटेंडर) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, महेश राऊळ, समर्थ तुळसकर, प्रदीप परुळकर, सदगुरू सावंत, बापू वेंगुर्लेकर, धीरज आळवे आणि शंकर देसाई आदी उपस्थित होते.
शिबिरात परिसरातील १६८ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या परवडणारी नेत्रसेवा मिळावी, या हेतूने शिबिरादरम्यान १८० रुपयांत चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी १२० चष्म्यांची विक्री सवलतीच्या दरात करण्यात आली. याबाबत शिबिरार्थींनी समाधान व्यक्त केले.
मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्या वैद्यकीय पथकाने डॉ. केतन सनी यांच्या नेतृत्वाखाली सुनील मुळीक, जयवंत मुळीक आणि उत्तेज परब यांनी रुग्णांची तपासणी केली. सर्व सहकारी संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या नेत्र आरोग्याबाबत जागरूकता वाढेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com