वटवृक्षाची फांदी तोडणाऱ्यावर कारवाई करा
swt1815.jpg
11583
कुडाळ ः येथील वृक्षप्रेमी नागरिकांनी फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदन सादर केले. (छायाचित्र ः अजय सावंत)
वटवृक्षाची फांदी तोडणाऱ्यावर कारवाई करा
वृक्षप्रेमींची मागणीः कुडाळ पोलिस निरिक्षकांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः शहरातील जिजामाता चौकातील दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकणी कुडाळमधील वृक्षप्रेमी एकवटले. त्यांनी आज येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिले.
येथील शहर जिजामाता चौक पुतळ्यासमोर १५० वर्षापूवीचे वडाचे झाड आहे. या झाडाची फांदी सोमवारी (ता.१५) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमाराला तोडण्यात आली. याबाबत कुडाळमधील सर्वपक्षीय वृक्षप्रेमी एकत्र आले. त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध करत पोलिस निरीक्षक मगदूम यांची भेट घेतली. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षमित्रांतर्फे करण्यात आली. अशा आशयाचे निवेदन श्री. मगदूम यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, ''संबंधित झाडाचे नुकसान करुन त्याप्रमाणे मनुष्यहानीचा सुद्धा प्रयत्न होता,असे प्रत्यक्षदर्शी दिसते. यापूर्वी सुद्धा कुडाळ पोस्टमॉटम रुमकडील रस्त्यावर सहा झाडे तोडण्यात आली आहेत. त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे पत्र २९ मे २०२५ ला वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय कुडाळ यांनी दिले आहे. परंतु, त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याने याच विघ्नसंतोषी व्यक्तीकडून पुन्हा असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन कारवाई करावी.'' श्री. मगदूम यांनी चर्चेवेळी दोन दिवसांची मुदत द्या. या प्रकरणाचा तपास सुरु असून सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन वृक्षप्रेमींना दिले. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक चांदणी कांबळी, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, व्यापारी संघ तालुका अध्यक्ष श्रीराम शिरसाट, विजय उर्फ आनंद वालावलकर, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, मंदार चंद्रकांत शिरसाट, गुरुनाथ गडकर, संदीप कोरगावकर, श्री. पाटकर, विजय प्रभू, सुधार समितीचे प्रसाद शिरसाट, अभय शिरसाट, नितीश म्हाडेश्वर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

