‘देवरूख-साखरपा’ 
बस पुन्हा सुरू

‘देवरूख-साखरपा’ बस पुन्हा सुरू

Published on

‘देवरूख-साखरपा’
बस पुन्हा सुरू
साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपामार्गे रत्नागिरी जाणारी बस गेली अनेक वर्षे बंद होती. प्रवाशांच्या व नोकरदार वर्गाच्यादृष्टीने ही बस सोयीची होती; मात्र ती बंद केल्यामुळे गैरसोय निर्माण झाली होती. प्रवाशांची ही समस्या कोंडगाव ग्रुपग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी जाणून घेतली आणि याबाबत पाठपुरावा केला. आठल्ये यांनी देवरूख बसआगारातील अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर आमदार किरण सामंत यांना देवरूख-साखरपामार्गे रत्नागिरी गाडी सुरू करण्यासाठी निवेदन दिले. व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधून अखेर देवरूख येथून सुटणारी देवरूख-साखरपामार्गे रत्नागिरी गाडी सुरू करण्यात आली. देवरूख येथून साडेआठ वाजता सुटून ती साखरपा येथून सव्वानऊ वाजता रत्नागिरीकडे मार्गस्थ होते. त्यामुळे साखरपा ते हातखंबापर्यंतच्या प्रवाशांना ही गाडी सोयीची झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.


सरफरे महाविद्यालयातील
क्रीडा महोत्सव आजपासून
संगमेश्वर ः बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्था, मुंबई यांच्यावतीने बुरंबी (संगमेश्वर) येथील दादासाहेब सरफरे क्रीडानगरीत दादासाहेब सरफरे कला-क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा १६वा आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सव असून, संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शाळांचा मोठा सहभाग होता. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच अशा मैदानी क्रीडा स्पर्धांसह विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १८ ते २० असे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. लेझिम-झांजपथकासह देवी वाघजाई मंदिर, तेर्ये येथून दादासाहेब सरफरे क्रीडानगरीकडे भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडानगरी व महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. २० रोजी पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

फ्लॅट आरक्षणाचे बिल्डरला
पैसे द्यावे लागणार परत
चिपळूण ः कोलेखाजन येथील वैभव भगवान चिपळूणकर यांनी चिपळूण धामणवणे येथील एका बिल्डरकडे निवासी सदनिका आरक्षित केली होती. त्यासाठी धनादेशाद्वारे दोन वर्षांपूर्वी पाच लाख रुपये भरले होते. दुय्यम निबंधक कार्यालयात साठेकरार करण्यात आला होता; परंतु संबंधितांनी निवासी सदनिकेचे काम सुरू केले नाही. त्यामुळे आरक्षणासाठीची रक्कम परत मिळावी, अशी मागणी चिपळूणकर यांनी बिल्डरकडे केली; मात्र बिल्डरने चिपळूणकर यांना उडवाउडवीची उत्तरे देत अनामत रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर चिपळूणकर यांनी रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या न्यायालयात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली. तेथे चौकशी होऊन चिपळूणकर यांना त्यांची अनामत रक्कम परत करण्याचे आदेश बिल्डरला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com