विकास, प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड
-rat१८p७.jpg-
P२५O११५४६
मकरंद अनासपुरे
----
विकास, प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड
मकरंद अनासपुरे ः पुढील पिढ्यांना भोगावे लागणार वाईट परिणाम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जैवविविधतेच्या नाशाला मानवच कारणीभूत ठरत आहे. प्रगतीच्या नावाखाली मानवाने जैवविविधतेच्या नाश करण्यास सुरुवात केली आहे. याचे वाईट परिणाम आपल्यासह येणाऱ्या सर्वच पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. विकास, प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जात आहे. माणूस आपल्या ऱ्हासाकडे जात आहे, अशी खंत ही सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे व्यक्त केली.
रत्नागिरीत आलेल्या श्री. अनासपुरे यांच्याशी अनौपचारिक गप्पा झाल्या. त्यावेळी त्यांनी श्रम करणाऱ्या शेतकऱ्याला आपण प्रतिष्ठा देत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, माणसाने पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास धरली. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी तो आधुनिक शेतीकडे वळला. जास्तीत जास्त उत्पन्नासाठी रासायनिक खतांचा वापर होवू लागला. शेतीवर रासायनिक औषधांची फवारणी करू लागल्याने मानवी शरीराला आवश्यक पोषक घटक मिळणे अवघड झाले. रस्त्यांचे रुंदीकरण झाले, त्यामुळे गाड्यांचे प्रमाण देखील वाढले, अपघात वाढले. झाडे जंगले तोडल्याने वाघ, बिबटे, कोल्हे असे जंगली प्राणी मानवी वस्तीकडे वळले. आज माणसाला आजारांनी ग्रासले आहे. या आधुनिक शेतीचे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता मानवाला पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळावे लागणार हे ही निश्चित आहे.
‘एआय’संबंधी अनासपुरे म्हणाले, एआय हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर कसा करायचा हे आपणच ठरविले पाहिजे. एआय मानवी भावना, कर्तव्य पार पाडू शकत नाही. कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी आपली परंपरा व संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. मानवाची उत्पत्ती करू शकत नाही. त्यामुळे अशा ‘एआय’चा वापर मानवाने किती करायचा हे त्याच्याच हातात आहे. या तंत्रज्ञानामुळे फायदा व नुकसान हे दोन्हीही होणार आहे.
---
चौकट १
नाट्यगृहाचा वापर मराठी चित्रपटांसाठी करावा
मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस येण्यासाठी राज्यातील सर्वच नाट्यगृहाचा वापर मराठी चित्रपट दाखविण्यासाठी करता येईल, अशी सूचना अनासपुरे यांनी केली. नाटक किंवा कार्यक्रम नसेल त्या दिवशी कमी तिकीट दराने या ठिकाणी चित्रपट दाखविण्यात यावेत. त्यानिमित्ताने ओस पडलेली नाट्यगृहे वापरात येतील. यातून या नाट्यगृहांचा व कर्मचारी वर्गाचा खर्च सुटण्यास मदत होईल. अनेकांना महागाईत सिनेमागृहात चित्रपट पाहता येत नाहीत, अशा प्रेक्षकांना कमी दरात चित्रपट पाहता आल्यास ते सहकुटुंब मराठी चित्रपट पाहू शकतील, असे ही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

