राज्यस्तरीय लोगो स्पर्धेत ओंकार कोळेकर द्वितीय विजेता
-rat१८p१६.jpg-
२५O११५५७
‘वंदे मातरम्’ १५० वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय लोगो स्पर्धेत ओंकार कोळेकर यांनी साकारलेला या लोगोला द्वितीय क्रमांक मिळाला.
-rat१८p१६.jpg-
OP२५O११५६८
ओंकार कोळेकर.
---
लोगो स्पर्धेत ओंकार कोळेकर द्वितीय
‘वंदे मातरम्’ १५० वर्षपूर्ती; राज्य शासन आयोजित स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत रत्नागिरीतील ओंकार अनंत कोळेकर यांनी खुल्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यातून हजारो कलाकार व डिझायनर्सनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील यशाने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ही स्पर्धा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झाली. शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा तीन गटांमध्ये तिचे आयोजन करण्यात आले होते. कला, संस्कृती व राष्ट्रभक्तीचा संगम दर्शवणाऱ्या संकल्पनांना या स्पर्धेत प्राधान्य देण्यात आले. लोगोंचे परीक्षण मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथील नामवंत प्राध्यापकांनी केले. साधेपणा, अर्थपूर्ण प्रतीकात्मकता आणि प्रभावी सादरीकरणामुळे त्यांच्या लोगोची परीक्षकांकडून विशेष दखल घेण्यात आली. या लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अलीकडेच करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यातील विविध मान्यवर, वरिष्ठ अधिकारी तसेच कला व डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
ओंकार कोळेकर हे मूळचे रत्नागिरी शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी जिओ स्टुडिओमध्ये काही काळ सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करत प्रत्यक्ष माध्यम क्षेत्राचा अनुभव घेतला. सध्या ते मुंबई विद्यापीठातून मास मीडियाचे शिक्षण घेत आहेत.
------
कोट
‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यासाठी लोगोची स्पर्धा जाहीर झाल्यावर मनात कल्पना तयार करू लागलो. अवघ्या काही दिवसांत त्यावर अभ्यास करून लोगो तयार केला. या लोगोमध्ये राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक ग्राफिक डिझाईनचा प्रभावी संगम आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
- ओंकार कोळेकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

