आट्यापाट्या स्पर्धेत कासार्डे शाळा अव्वल
swt1817.jpg
11606
सिंधुदुर्गनगरीः जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या कासार्डे हायस्कूल संघासोबत क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, यशवंत परब, तृप्ती शेट्ये व इतर.
आट्यापाट्या स्पर्धेत कासार्डे शाळा अव्वल
तीन संघांना विजेतेपदः कोल्हापूर विभागीय स्तरासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सहा संघांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या स्पर्धेत ७२ खेळाडू यशस्वी ठरले.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये नीतेश गावडे, अनिकेत पवार, निखिल पन्हाळकर, दत्तराज केसरकर, वेदांत चव्हाण यांनी तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघातील भूकेश सुतार, अजय पवार, दुर्वेश गोसावी, निहार तांबे, सार्थक गुरव आदींच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजयश्री खेचून आणली. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघातील भक्ती लाड, स्वरा मोहिते, गार्गी पाताडे, पूर्वा आईर, सलोनी पाताडे, तन्वी जाधव यांनीही उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजय संपादन केला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रशालेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या संघाने, १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद, तर १४ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या संघाने आणि १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. या यशस्वी संघामधून विजेत्या संघाची कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, देवेंद्र देवरुखकर, यशवंत परब, तृप्ती कुडतरकर, पूजा पाताडे, वैष्णवी डंबे, विनायक पाताडे, दिवाकर पवार, नवनाथ कानकेकर यांच्यासह विद्यालयाच्या क्रीडा विभागातील इतर सर्व शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व स्कूल कमिटी, पालक-शिक्षक संघ, प्रा. बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. कोल्हापूर विभागीय स्पर्धा २३ व २४ डिसेंबरला तळेरे हायस्कूल येथे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

