-लांजात दिव्यांग आनंद मेळावा उत्साहात
-rat१८p२३.jpg-
२५O११६१२
लांजा ः दिव्यांग बांधवांना दाखले वाटप करताना भारती नाटेकर. शेजारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी श्री. लोखंडे, समीर नाकाडे आदी.
---
लांज्यात दिव्यांग आनंद मेळावा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १९ ः जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग जनकल्याण संस्थेतर्फे दिव्यांग आनंद मेळावा कुलकर्णी काळे छात्रालयात झाला.
कार्यक्रमाला दिव्यांग समन्वय समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक भुस्कुटे, आर. एच. पी. फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, दिव्यांग सेवा संस्था चिपळूणचे अध्यक्ष भारती नाटेकर, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी श्री. लोखंडे, समीर नाकाडे, दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे, शांताराम लाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी दिव्यांग दाखले आणि रेल्वे पास यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सन्मान सोहळा पार पडला. संस्थेच्या सभासदांना ओळखपत्र देखील वितरण करण्यात आले. यानंतर दिव्यांग बांधवांचे विविध खेळ, दिव्यांग कला बहर आदी कार्यक्रम झाले. दिव्यांग जनकल्याण संस्थेचे उपाध्यक्ष किरण धनावडे यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना संदर्भात मार्गदर्शन केले.

