अल्पसंख्याकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा

अल्पसंख्याकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा

Published on

-rat१८p२०.jpg-
P२५O११६००
रत्नागिरी ः अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित नागरिक.
---------
अल्पसंख्याकांनी योजनांचा लाभ घ्यावा
अमर पाटील ः अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः जिल्हा अल्पसंख्याक कक्षामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा लाभ संबंधितांना घेता यावा, यासाठी त्याची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवावी, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.
जिल्हा अल्पसंख्याक कक्षामार्फत नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव या विषयावर श्री. सिद्धीकी आणि इक्रा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष इलियास बगदादी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गवाणकर उपस्थित होते. जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्री. पाटील म्हणाले, अल्पसंख्याक कक्षामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून देणे, निवासी पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण प्रस्तावांची छाननी करून शासनाला सादर करणे, अल्पसंख्याक शाळांना धार्मिक व भाषिक दर्जा प्रमाणपत्र वितरण करणे अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याची माहिती सर्वांपर्यंत समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. श्री. सिद्धीकी म्हणाले, अल्पसंख्याक समाज शिक्षणापासून वंचित आहे. त्याची जनजागृती करणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी जागरूक होणे आवश्यक आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com