अभ्युदयनगरमध्ये बिबट्याचा वावर
-rat१८p२५.jpg-
25O11664
रत्नागिरी ः अभ्युदयनगर येथे रस्ता ओलांडताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या.
-----
अभ्युदयनगरमध्ये बिबट्याचा वावर
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ; नागरिकांत भीतीचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : शहराच्या मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदयनगर परिसरात बिबट्याचा मुक्त वावर आढळून आला आहे. काल रात्रीच्या बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहरात भरवस्तीत बिबट्याने प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याची दखल घेऊन योग्य ते उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील अभ्युदयनगर येथील नरहर वसाहत येथे काल रात्री ही घटना घडली. या वसाहतीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरजोराने भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि आक्रमक असल्याने कलंगुटकर यांना संशय आला. त्यांनी तत्काळ उठून खिडकीतून बाहेर पाहिले तर रस्त्यावर इतर भटकी कुत्री जोरजोरात भुंकत होती. संशय बळावल्याने त्यांनी आपल्या घराच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यामध्ये त्यांना बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. संदेश कलंगुटकर यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

