पोलीस पाटील प्रशासनातील महत्त्वाचा दूवा
swt191.jpg
11756
वेंगुर्लेः येथे आयोजित पोलीस पाटील दिन कार्यक्रमात बोलताना आरवली वेतोबा देवस्थान अध्यक्ष जयवंत राय.
पोलीस पाटील प्रशासनातील महत्त्वाचा दूवा
जयवंत रायः वेंगुर्ले येथे पोलीस पाटील दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १९ः पोलीस पाटील पद ऐतिहासिक काळापासून आजपर्यंतच्या प्रशासन व्यवस्थेत सन्मानचे पद आहे. या पदाची जबाबदारी प्रामाणिक निष्ठेने संभाळत पोलीस पाटलांनी पदाचा मानसन्मान ठेवत काम करावे. समाज व प्रशासन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील फार महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्लेतर्फे सावंतवाडी उपविभाग (प्रांत) पोलीस पाटील संघटनेच्या संकल्पनेतून वेंगुर्ले रामघाट येथील सातेरी मंगल कार्यालय येथे पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, प्रांत पोलीस पाटील विभाग अध्यक्षा जागृती गावडे, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, आरवली सरपंच समीर कांबळी, सावंतवाडी पोलीस पाटील संघटना तालुका उपाध्यक्ष नितीन नाईक, दोडमार्ग तालुका संघटक सचिन सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तानाजी सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मधुसुदन मेखी, प्रतीक्षा मुंडये, सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमांत सावंतवाडी उपविभाग (प्रांत) संघटनेतर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन उत्कृष्ट सेवा बजावलेल्या निवृत्त व विद्यमान पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. यात मधुसुदन मेस्त्री (आरवली), विजय नार्वेकर (उभादांडा), जागृती गावडे (इन्सुली), परशुराम गावडे (मोचेमाड), सुभाष गावडे (पाल), बापूशेठ चव्हाण (कोचरा), शरद जाधव (वेंगुर्ले शहर), प्रभाकर केळुसकर (केळूस), सुभाष घोळेकर (परूळे नं.१), पांडुरंग आडेलकर (आडेली), भिकाजी जाधव (होडावडा), प्रकाश तुळसकर (तुळस), जनार्दन कदम (रेडी), बापू गावडे (अणसुर), पांडुरंग कांबळे (विलवडे), अरूण लिंगवत (वेर्ले), दिगंबर गवस (दोडामार्ग-पिकुळे), अशोक कांबळी (तेरवण-मेढे), तानाजी सावंत (कुणकेरी), राजाराम पेडणेकर (उभादांडा), ऋतिका नाईक (पाल), लक्ष्मण गावकर (ओटवणे), सुशांत नाईक (वरचीवाडी वेतोरे), देऊ सावंत (पणदूर), संजय गवस (सासोली), दशरथ चव्हाण (म्हापण), मारूती चव्हाण (परूळे नं. २), देऊ गावडे (अणसुर), लवू तुळसकर (तुळस) यांचा समावेश होता.
यावेळी पोलीस निरीक्षक ओतारी म्हणाले, ‘‘प्रशासन व गावाची जोडणारी नाळ म्हणजेच पोलीस पाटील. प्रशासनाचे ते कान, नाक आणि डोळे आहेत. त्यांच्या विश्वासावर प्रशासनाचे चाक पुढे चालते. गावातील शांतता, सुव्यवस्था ही पोलीस पाटलांच्या योगदानामुळेच राखली जाते. पूर, आग अपघात वा नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांना मदत पोलीस पाटील करतो. समाजातील खरा नायक पोलीस पाटील आहे. पोलीस प्रशासनातील मनुष्यबळाची मर्यादेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला पोलीस पाटलांची जी मदत मिळते ती अविश्वसनीय आहे.’’
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, सावंतवाडी पोलीस पाटील प्रांत विभागाच्या अध्यक्ष जागृती गावडे, निवृत्त पोलीस पाटील लवू तुळसकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आजगावच्या पोलीस पाटील - निकिता पोखरे यांनी केले. तुळस पलतडच्या पोलीस पाटील चारूता परब यांनी सूत्रसंचालन केले, तर पाल गावच्या पोलीस पाटील ऋतिका नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

