पालीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
पालीत जिल्हास्तरीय
कबड्डी स्पर्धा
पाली ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालीमध्ये रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा महिला व पुरुष गटामध्ये २३, २४, २५ डिसेंबरला होणार आहेत. विजेत्या पुरुष गट संघाला २१ हजार १११ रुपये, उपविजेत्याला १५ हजार ५५५ रुपये व व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन पाली युवा मंच, शिवसेना शाखा पाली पाथरट व युवासेना यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अतुल सावंत, स्वप्नील घडशी, ऋषिकेश साळुंखे यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे. स्पर्धा डी. जे. सामंत महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
शास्त्रीपूल ते नायरी
रस्त्यावर भरले खड्डे
संगमेश्वर ः शास्त्रीपूल ते नायरी हा रस्ता होऊन चार वर्षे झाली तरी या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होते तसेच या मार्गावर कसबा ही मोठी शाळा असून, तिच्या गेटजवळही मोठे खड्डे होते. त्यामुळे मुलांनासुद्धा खूप त्रास होत होता. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन दिल्यानंतर अखेर खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे.
‘स्मार्ट मीटरची सक्ती
खपवून घेणार नाही’
संगमेश्वर ः तालुक्यात स्मार्ट वीजमीटरची जबरदस्तीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न होत असल्यास तो उबाठा शिवसेना कदापिही सहन करणार नाही, असा इशारा उबाठा शिवसेना विभागप्रमुख वैभव मुरकर यांनी दिला आहे. लोकांच्या संमतीशिवाय आणि विश्वासात न घेता लादली जाणारी ही योजना म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली जादा वीजबिल, प्रीपेड प्रणालीचा धोका आणि ग्राहकांचे हक्क डावलण्याचा प्रकार सुरू आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर आणखी बोजा टाकण्याचा हा प्रकार आहे, असे मत वैभव मुरकर यांनी व्यक्त केले. ही सक्ती तत्काळ थांबवावी अन्यथा जनतेत निर्माण होणाऱ्या असंतोषाला जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा मुरकर यांनी दिला.
दिग्विजय चौगुलेचे
शूटिंग स्पर्धेत यश
रत्नागिरी ः श्रीराम मंदिर संस्थेचे विश्वस्त बाबासाहेब चौगुले यांचा नातू दिग्विजय चौगुले याने राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. सध्या ही स्पर्धा भोपाळ येथे सुरू आहे. स्पर्धेत चौगुलेने renowned shot ही पदवी संपादन केली आहे. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ट्रायलसाठी त्याला संधी मिळाली आहे. त्याला पुष्कराज स्पोर्टस शूटिंग अॅकॅडमीचे प्रशिक्षक व मालक पुष्कराज जगदीश इंगोले आणि राजश्री पुष्कराज इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

