कणकवली : शिवसेना कार्यकारीणी बैठक

कणकवली : शिवसेना कार्यकारीणी बैठक

Published on

kan191.jpg
11857
कणकवली : येथील विजयभवन येथे ठाकरे शिवसेना जिल्‍हा कार्यकारिणी बैठकीत वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सांवत यांनी मार्गदर्शन केले.

पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचे षडयंत्र उधळणार
वैभव नाईक : कणकवलीत ठाकरे शिवसेनेची जिल्‍हा कार्यकारिणी बैठक
कणकवली, ता. १९ : मतांसाठी पैसे देऊन निवडणुका जिंकण्याची सत्ताधाऱ्यांची मानसिकता जनतेच्या सहकार्याने जिल्हापरिषद-पंचायत समिती निवडणुकीत मोडून काढू, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी आज दिला.
ठाकरे शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज कणकवली येथील विजय भवनात झाली. यात माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी येत्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार व्यक्‍त केला.
या बैठकीत तालुकाप्रमुखांना आपापल्या तालुक्यात बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी तयार करण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी दिले. तसेच निवडणूक जाहीर होताच अधिकृत उमेदवारांची नावे तत्काळ जाहीर केली जाणार असल्‍याचे स्पष्‍ट केले. तर शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर असणारे होतकरू, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि उच्च विचारसरणीचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जाणार असल्याची माहिती परशुराम उपरकर यांनी यावेळी दिली. मागील साडेतीन वर्षांत राज्यात भाजप-शिंदे गटाच्या महायुतीची सत्ता असतानाही जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला.
सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारी रुग्णालयांत डॉक्टर उपलब्ध नाहीत, मशीनरी बंद पडल्या आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांची लूट होत आहे. बांधकामासाठी वाळू उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना भात शेतीची नुकसान भरपाई, कृषिपंप, सिंचन विहिरींचा निधी मिळत नाही. वनसंज्ञा जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे, हत्ती-माकड-रानगवे शेतीचे नुकसान करीत आहेत. रस्ते खड्डेमय झाले असून निधीच मंजूर होत नाही. जिल्हा नियोजन निधी, ठेकेदारांची देयके, डीएड बेरोजगारांची भरती, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे सर्व प्रश्‍न घेऊन आम्‍ही जनतेसमोर जाणार असल्‍याचे यावेळी श्री.नाईक, श्री.सावंत आणि श्री. उपरकर म्‍हणाले.
कार्यकारिणीच्या या बैठकीला ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, हरी खोबरेकर, नंदू शिंदे, रमेश सावंत, बबन बोभाटे, सचिन कदम, सुशांत नाईक, मंदार शिरसाट, अतुल बंगे, विजय जाधव, रवींद्र जोगल, पप्पू परुळेकर, मंदार ओरसकर, गणेश गावकर, यशवंत गावकर, गुलजार काझी, प्रकाश वालावलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com