विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यातून वैज्ञानिक जागृती

विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यातून वैज्ञानिक जागृती

Published on

-rat२०p५.jpg-
२५O११९९६
लाटवण : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्‍घाटनाप्रसंगी पथनाट्यातून वैज्ञानिक संदेश देताना लाटवण हायस्कूलचे विद्यार्थी.
----
मंडणगड तालुका विज्ञान प्रदर्शनात रंगत
पथनाट्यासह कलाकौशल्यातून वैज्ञानिक जागृती
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २० ः पंचायत समिती शिक्षण विभाग आणि लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित मंडणगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन लाटवण येथे स्वागत, गायन आणि पथनाट्य सादरीकरणातून वैज्ञानिक जागृती करून करण्यात आले.
या वेळी मंडणगड तालुका विकास मंडळाचे सरचिटणीस अ‍ॅड. विनोद दळवी, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, प्रताप घोसाळकर, श्रीपाद कोकाटे, विनोद जाधव, अस्मिता केंद्रे, आत्माराम सुतार, दिनकर कदम आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विज्ञान दिंडी, स्वागत सोहळ्यानंतर प्रतिकृती प्रदर्शन खुले करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती शिक्षण विभाग, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक संघ, विज्ञान शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Marathi News Esakal
www.esakal.com