संक्षिप्त-स्वाधार योजनेसाठी ३१ पर्यंत मुदतवाढ
स्वाधार योजनेसाठी
३१ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, ता. २० ः जिल्ह्यातील इयत्ता अकरावी, बारावी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती ‘समाज कल्याण’चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. या योजनेसाठी २०२४-२५ मध्ये नोंदणी केलेले तसेच चालू वर्षात प्रवेशित विद्यार्थी अर्ज करू शकतात. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पीडीएफ व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह १ जानेवारीपर्यंत नजीकच्या मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह/महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे समक्ष किंवा टपालद्वारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. संबंधित महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत सूचित करावे, असे आवाहन श्री. चिकणे यांनी केले आहे.
.....................
कुडाळात बुधवारी
उद्योजक मेळावा
सिंधुदुर्गनगरी ः कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि दे आसरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २४) सकाळी दहा ते दुपारी दीड दरम्यान संत राऊळ महाराज महाविद्यालय, एस. एन. देसाई चौक, कुडाळ येथे उद्योजक मेळावा आयोजित केल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी दिली. या मेळाव्याचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, गृहउद्योजक, लघू व मध्यम उद्योजक, पारंपरिक कारागीर व महिला बचतगट या घटकांसाठी केले आहे. या मेळाव्यासाठी डॉ. आनंद गोडसे (प्रोग्रॅम मॅनेजर, दे आसरा फाउंडेशन) व्यवसाय वाढीसाठी उत्तम नेटवर्किंग कसे करावे, यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तेजस धारकर (प्रोग्रॅम मॅनेजर, अनग्रोथ फाउंडेशन) हे सोशल मीडियाचा वापर करून व्यवसाय वेगाने वाढवण्याचे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमध्ये विनामूल्य असून इच्छुक उमेदवारांनी लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन येरमे यांनी केले आहे.
......................
जडसंग्रह साहित्य
विक्रीसाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडीच्या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे. ज्या खरेदीदारास साहित्य विकत घ्यावयाचे आहे, त्यांनी ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सिलबंद लिफाप्यात दरपत्रक या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन वैभववाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल, अशा पात्र खरदीदारास साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल, त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरून साहित्य स्वखर्चाने घेऊन जावे लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा, विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

