

-rat20p3.jpg-
25O11994
रत्नागिरी : जेएसडब्ल्यू समुहाच्या जयगड येथील जीवक उद्यानाला क्षेत्रभेटीदरम्यान गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती देताना योगिता महाकाळ.
--------
‘गोगटे’च्या विद्यार्थ्यांची जीवक उद्यानास भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागामार्फत जेएसडब्ल्यू समुहाच्या जयगड येथील जीवक उद्यान येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. जीवक हे प्राचीन भारतातील एक महान वैद्य होते. त्यांच्या वैद्यकात वापरलेल्या कदंब, अमालकी, श्वेतचंदन, वस आदी वनस्पती या उद्यानात संवर्धित केल्या आहेत. याची औषधी वनस्पती आणि त्यांच्या उपयुक्ततेबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
विद्यार्थ्यांना पर्यावरण व सभोवतालच्या औषधी वनस्पतींची माहिती व्हावी व त्यातून संवर्धन व्हावे असा उद्देश समोर ठेवून या क्षेत्रभेटीचे आयोजन केले. यात प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जयगड येथील जेएसडब्ल्यू समुहाच्या सीएसआर विभागामार्फत मत्स्यपालन, रोपवाटिका तसेच कोकणातल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन केले जाते. या संपूर्ण परिसरातील मत्स्यपालन प्रामुख्याने माशांतील विविध प्रजाती, माशांची प्रजनन क्रिया आणि त्यांचे संवर्धन करत अगदी छोट्याशा जागेत करता येण्याजोगी भाजीपाला तसेच फळबाग यांची शेती याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात जाणून घेतले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. श्रावणी केतकर, प्रा. नेहा जोग यांनी भेटीदरम्यान विशेष सहकार्य केले.
चौकट १
६३ वनस्पतींचे संवर्धन
जीवक हे बुद्ध आणि मगधचा राजा बिंबिसार यांचे वैयक्तिक चिकित्सक होते. बालरोगतज्ज्ञ आणि आयुर्वेद व शस्त्रक्रियेत निपुण असलेल्या या वैद्यकीय शल्यचिकित्सकांनी वैद्यकीत वापरलेल्या ६३ वनस्पती या उद्यानात संवर्धित केल्या आहेत. त्यात कदंब, अमालकी, श्वेतचंदन, वस, राळ, भ्रुंगराज, करंज, हरीतकी अशा औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.