राणेंसमोर दिलगिरी, पण खेचला विजयी ‘चौकार

राणेंसमोर दिलगिरी, पण खेचला विजयी ‘चौकार

Published on

-rat२२p९.jpg-
P२५O१२५५८
शशिकांत मोदी
----
विरोधकांवर मात करत विजयाचा ‘चौकार’
चिपळूण पालिका ; मोदी सर्वाधिक अनुभवी नगरसेवक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी विजयाचा खणखणीत ‘चौकार’ लगावत पक्षांतर्गत विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले. काही महिन्यांपूर्वी भाजपमधील एका गटाच्या दबावामुळे त्यांना मंत्री नीतेश राणे यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त करावी लागली होती; मात्र त्या अपमानावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मोदींनी त्याचा जाब थेट निवडणूक निकालातून दिला आणि चौथ्यांदा दिमाखात विजय मिळवला.
शहरातील प्रभाग क्र. ९ मधून तब्बल ८००हून अधिक मतांनी मोदी यांनी दणदणीत विजय मिळवला. चिपळूण पालिकेतील सर्वात अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाणार आहे. यापूर्वी तीनवेळा शिवसेनेकडून नगरसेवक राहिलेल्या मोदींनी, शिवसेनेतील फुटीनंतर काही काळ उद्धव ठाकरे गटासोबत राहणे पसंत केले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांना चिपळूण शहरप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. हीच गोष्ट पक्षातील काही घटकांना खटकली. यातूनच विरोधकांनी मोदींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मंत्री नीतेश राणे चिपळूण दौऱ्यावर असताना या गटाने मोदींविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. मोदी नको म्हणून बैठकीत जाहीर विरोध करण्यात आला. शिवसेनेतील जुन्या राजकीय संघर्षांचे दाखले देत वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करून मोदींनी वादाला पूर्णविराम दिला; मात्र निवडणुकीतही हा संघर्ष थांबला नाही. थेट मोदींच्या विरोधात उमेदवारी दाखल करून त्यांचा पराभव करण्याचा चंग बांधण्यात आला. ज्या निवडणुकीत अनेक माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला त्याच लढतीत मोदी यांनी चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विरोधकांची बोलती बंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com