

swt2310.jpg
O12811
पाटः डॉ. विलासराव देसाई महाविद्यालयात ‘खाद्य जत्रा’ घेण्यात आली.
डॉ. देसाई महाविद्यालयामध्ये
‘खादय जत्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २३ः पाट (ता. कुडाळ) येथील डॉ. विलासराव देसाई महाविद्यालयात ‘खाद्य जत्रा’ आयोजित करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.ई. विभागामार्फत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या स्टॉलवर विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ, उपस्थित मान्यवरांनी खाद्य मेनूंचा आस्वाद घेतला. एकूणच खवय्यांची यानिमित्ताने चांगलीच चंगळच झाली होती. पाट येथील डॉ. विलासराव देसाई महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबविले जातात.
वर्षभरात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. खाद्य जत्रेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सकाळीच महाविद्यालयात उपस्थित राहत आपल्या स्टॉलची आकर्षकरित्या मांडणी केली. मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड गर्दीत या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि चविष्ट, सजवलेली डिश खवय्यांना उपलब्ध करून दिली जात होती. त्याच ठिकाणी विद्यार्थिनींनी अन्न शिजवण्यासाठी चुलीची मांडणी करून गरमागरम पदार्थ मागणीनुसार तयार करून दिले. गरमागरम कांदा भजी, बटाटा भजी पाव, मिसळपाव, पोहे, उसळ पाव त्याचबरोबर ओली भेळ, चहा यांसह विविध रुचकर आणि चविष्ट पदार्थ खवय्यांना या निमित्ताने उपलब्ध झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.