कुडाळ केळबाई मंदिरात रविवारी कला कार्यशाळा
swt231.jpg
O12810
नामानंद मोडक
कुडाळ केळबाई मंदिरात
रविवारी कला कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी येथील श्री देवी केळबाई मंदिरात रविवारी (ता. २८) दुपारी ३ वाजता चित्रकला संदर्भातील कलात्मक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेला देशपातळीवरील विख्यात चित्रकार, शिल्पकार नामानंद मोडक मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित कुडाळ तालुकास्तरीय चित्रकलेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये पाचवीपासून पुढील विद्यार्थांना सहभाग घेता येणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव, पत्ता व व्हॉटसअप नंबर आवश्यक आहे. अर्जाची लिंक २६ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी विष्णू माणगावकर यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. वालावलकर हितचिंतकांकडून करण्यात आले आहे.
येथील श्री देवी केळबाई मंदिरात तालुकास्तरीय चित्रकला आयोजित केली होती. या स्पर्धेला पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कार्यशाळेदरम्यान चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे.
.................
swt232.jpg
12818
नांदगावः ग्रामपंचायतीतर्फे पाटवणेवाडी येथे कच्चा बंधारा बांधण्यात आला.
नांदगाव पाटवणेवाडीत
श्रमदानातून बंधारा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः कणकवली पंचायत समितीच्या आवाहनानुसार नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पाटवणेवाडी येथील महापुरुष मंदिर नजीक बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाबाबत पंचायत समिती स्तरावरून नांदगाव ग्रामपंचायतीचे कौतुक करण्यात आले.
या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास, शेतीस व पिण्याच्या पाण्यास लाभ होण्यास तसेच संभाव्य पाणीटंचाई कमी करण्यास निश्चितच मदत होणार आहे. गेल्यावर्षीही नांदगाव ग्रामपंचायतीमार्फत ठिकठिकाणी कच्चे बंधारे बांधून पाणी अडविले होते. यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली होती. या स्तुत्य उपक्रमासाठी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. सावंत, ग्रामपंचायत सदस्या गौरी परब, कृषिसेवक श्री. पवार, राजू खोत, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले.

