नृत्य-नाटिकांनी झारापवासीय मंत्रमुग्ध
swt234.jpg
O12820
झारापः कामळेवीर शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.
नृत्य-नाटिकांनी झारापवासीय मंत्रमुग्ध
कामळेवीर शाळेचे स्नेहसंमेलनः गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झाराप कामळेवीर शाळेचे स्नेहसंमेलन १३ व १४ डिसेंबरला विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले. पहिल्या दिवशी माजी विद्यार्थी मेळावा व बक्षीस वितरण समारंभ तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थी स्नेहसंमेलन झाले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्ये, नाट्यप्रयोग, रेकॉर्ड डान्स, नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी उदय गोवेकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षिका मंजुषा मांजरेकर यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद भोगटे (माजी रोटरी अध्यक्ष, कुडाळ), झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, माणगाव प्रभाग विस्तार अधिकारी सुलभा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी चर्चा केली. मेळाव्यासह बक्षीस वितरण समारंभ पार पडला. वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा आणि कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भालचंद्र आजगावकर यांनी सूत्रसंचालन, तर प्रास्ताविक मुख्याध्यापक कदम, अहवाल वाचन श्रीमती निरवडेकर, बक्षीस वितरण निवेदन रुचिता राऊळ यांनी केले. विलास कोटकर यांनी आभार मानले.
सायंकाळी आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘स्वर्गाची पायरी’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला. यामध्ये महागणपती-अथर्व वेंगुर्लेकर, रिद्धीसिद्धी-दुर्वा वराडकर व पलक पाटकर, राजा वैष्णव-हर्ष रेडकर, राणी रमा-अनन्या आळवे, मडवळ-लौकिक आळवे, मडवळीन-निधी वराडकर, गरुड-अजय कक्केरकर, नारद-आर्यन कानसे, यमधर्म-वेदांत वराडकर, काळदूत-साईश पाटकर, विष्णू-हरिश्चंद्र गुडेकर, लक्ष्मी-अलीना जिद्दी, यक्षाची लक्षवेधी भूमिका कुमार अक्षय कक्केरकर यांनी साकारली.
दुसऱ्या दिवशी वार्षिक विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक मांजरेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गंगाधर गोवेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम रेडकर, उपाध्यक्ष अर्चिता रेडकर, माजी अध्यक्ष घनश्याम आळवे, विजय वराडकर, यशवंत वराडकर, सचिन तेंडोलकर, नीलेश तुळसकर, कृष्णा कोंडूरकर, मिलिंद भैरे, आनंद भैरे, रामदास चांदरकर, महेश आळवे, मुख्याध्यापक विजय कदम, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, आजी-माजी विद्यार्थी संघ, सर्व ग्रामस्थ, पालक, महिला यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

