बांदा पीएमश्री केंद्रशाळेचा वर्धापन सोहळा उत्साहात
12814
बांदा पीएमश्री केंद्रशाळेचा
वर्धापन सोहळा उत्साहात
बांदा, ता. २३ ः येथील पीएमश्री केंद्रशाळा क्रमांक एकचा १७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा ऐतिहासिक वारसा, तिची भव्य इमारत आणि शाळेवर असलेली ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांची श्रद्धा आणि प्रेम यांचा गौरव करण्यात आला. शाळेचा ऐतिहासिक ठसा, प्रगतीची वळणे, शाळेच्या विकासात ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर भाष्य करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, मुख्याध्यापक शांताराम असनकर, माजी विद्यार्थी नंदू बांदेकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन १७२ वा वर्धापन दिन केक कापून साजरा केला. यावेळी शाळेच्या वतीने मुलांना लाडू वाटले. गतवर्षी सावंतवाडी येथील मठकर कुटुंबीयांनी शाळेच्या किचन शेड इमारतीचे पूर्ण बांधकाम करून दिले होते. त्यांच्या या योगदानाचा आदर्श इतरांनी घेत शाळेच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

