गोगटे महाविद्यालयाच्या झेप महोत्सवाला प्रारंभ

गोगटे महाविद्यालयाच्या झेप महोत्सवाला प्रारंभ

Published on

rat२३p१२.jpg-
२५O१२८०८
रत्नागिरी : गोगटे महाविद्यालयात झेप महोत्सवावेळी बोलताना डॉ. आनंद आंबेकर. सोबत विजय शिवलकर, सतीश शेवडे, डॉ. मकरंद साखळकर आदी.
-----
‘झेप’ महोत्सवाचा रंगारंग प्रारंभ
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली ७२ सांस्कृतिक स्पर्धा ; ‘गोगटे’त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) वार्षिक सांस्कृतिक झेप महोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. महोत्सवात ७२ कलाप्रकाराच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी कार्यवाह शेवडे म्हणाले, झेपमध्ये कायमच विद्यार्थी विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या मुंबई विद्यापिठाच्या तीन वर्षाच्या ते पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेचा दोन तासाचा दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला होता.
हिंदी कलाक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऱ्हीदम अॅरेंजर, विशेष अतिथी विजय शिवलकर यांनी आपल्याइतके शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याबद्दल समाधान व्यक्त केले. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या डिग्रीसंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करू, असे जाहीर केले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी झेप महोत्सव केवळ सांस्कृतिक महोत्सव नाही तर व्यवस्थापनाचीसुद्धा स्पर्धा होते. संपूर्ण जबाबदारी विद्यार्थी घेत असतात, ही अतिशय समाधानकारक गोष्ट आहे, असे आवर्जून सांगितले. सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, नियामक मंडळाचे सदस्य मंदार गाडगीळ आणि मनोज पाटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. यास्मीन आवटे, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते.
--------
चौकट
उद्योजकता विकास
विद्यार्थी उद्योजकांसाठी २४ स्टॉलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विद्यार्थी उद्योजक आपले व्यावसायिक भागीदार निश्चित करतात, प्रारंभिक रक्कम उद्योगांमध्ये गुंतवतात आणि दिवसभरामध्ये किती व्यवसाय होऊ शकतो, याचा अंदाज घेऊन स्टॉलचे नियोजन करतात, अशी उद्योजकाची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com