राजापूर-वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणारे सौर बुजगावणे

राजापूर-वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणारे सौर बुजगावणे

Published on

काही सुखद---लोगो
rat23p13.jpg-
12809
राजापूरः ‘सौर बुजगावणे’ या विज्ञान प्रतिकृतीची माहिती देताना पाचल हायस्कूलचे विद्यार्थी.

वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणारे सौर बुजगावणे
पाचल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग; मिरची, तिखटाचा फटाकाही फुटणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ः राज्याच्या विविध भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राणी आणि मानव असा संघर्ष उभा राहिलेला आहे. बिबट्यासह डुक्कर, वानर, गवारेड्याचे हल्ले रोखण्यासाठी शासनाकडूनही विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सत्यनारायण देसाई आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर अन् हल्ल्यापासून संरक्षण करणारे ‘सौर बुजगावणे’ हे मॉडेल साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
गोल फिरणाऱ्या या सौर बुजगावण्याच्या हातात आणि डोक्यावर असलेल्या बॅटरीचा सर्वदूर पडणारा प्रकाश आणि लाल तिखट किंवा मिरचीचा वापर करून मोशन सेन्सरला जोडलेला छोटा फटाका बिबट्याचा मानवीवस्तीतील वावर रोखण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे. पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक देसाई यांनी सातत्याने पर्यावरणपूरक आणि समाजभिमुख विज्ञान प्रतिकृती (मॉडेल) तयार केल्या आहेत. या वेळी त्यांनी राज्यभरामध्ये चर्चेचा मुद्दा ठरलेल्या बिबट्यासह वन्यप्राण्यांचा मानवीवस्तीतील वावर आणि हल्ला रोखणाऱ्या उपाययोजना यावर आधारित विद्यार्थ्यांसमवेत तयार केलेल्या ‘सौर बुजगावणे’ या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि टिकाऊ असलेल्या या विज्ञान प्रतिकृतीसह ही प्रतिकृती तयार करणारे शिक्षक देसाई आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

चौकट
सौर बुजगावणे कसा रोखणार वन्यप्राण्यांचा वावर
हात आणि डोक्यावर बॅटरी असलेले हे सौर बुजगावणे अन्य बुजगावण्यांप्रमाणे एका जागेवर स्थिर न राहता फिरत राहते. रात्रीच्या वेळी हे बुजगावणे कार्यरत होत असून, त्याला जोडलेल्या बॅटरीचा प्रकाश आजूबाजूला शेतशिवार-जंगलपरिसरामध्ये पडायला लागला की, बिबट्या वा वन्यप्राणी घाबरून त्या ठिकाणी येत नाहीत. हे बुजगावणे वाडीच्या किंवा चार-पाच घरांमध्ये लावले आणि त्याला एलडीआर सेन्सर जोडावा. त्या सेन्सरला पुढे लाईट जोडून त्या घर-वाडी वा लोकवस्तीच्या भोवती जोडल्या तर हे बुजगावणे फिरत असताना ही सगळी सर्किट आपोआप कार्यरत होतात. त्याच्या सहाय्याने लोकवस्तीच्या आजुबाजूला लाईट पेटत राहतो, आवाज होत राहतो, ज्याच्या भितीमुळे बिबट्या किंवा वन्यप्राणी मानवीवस्तीच्या जवळ येणार नाही. त्याचवेळी बुजगावण्याला मोशन सेन्सर जोडलेले आहे. समजा त्या भागामध्ये बिबट्या वा वन्यप्राणी आल्यास मोशन सेन्सर कार्यरत होतो आणि त्याला जोडलेला एक छोटासा फटाका ज्याला लाल तिखट किंवा मिरचीचा वापर केलेला आहे तो फुटतो. त्यामुळे मिरचीचा वास तिथे पसरतो. हा वास नाकाला झोंबत असल्याने जंगली श्वापदांना तो आवडत नसल्याने वन्यप्राणी पुन्हा त्या ठिकाणी येत नाहीत.

कोट
पर्यावरणपूरक आणि कोणतीही इजा न करणाऱ्या उपाययोजना करून बिबट्या वा वन्यप्राण्यांचा मानवीवस्तीतील वावर कसा कमी करता येईल? जंगली श्‍वापदे वा बिबट्यापासून शेतकरी अन् माणसांचे कसे संरक्षण करता येईल अशी नावीन्यपूर्ण संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सौर बुजगावणे मॉडेल निर्मिती केली आहे. हे बुजगावणे सौरऊर्जेवर चालणारे असून, कमी खर्चिक, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक आहे.
- सत्यनारायण देसाई, शिक्षक, सरस्वती विद्यामंदिर, पाचल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com