गोळप येथे आज शेतकरी मेळावा
गोळप येथे आज
शेतकरी मेळावा
पावसः महाराष्ट्र शासन कृषी विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक यांच्यावतीने गोळप येथे बुधवारी (ता. २४) कृषी मंडळनिहाय आंबा, काजू व भात नाचणीविषयक पिकांच्या लागवड तंत्रज्ञान व संरक्षण शेतकरी मेळावा सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये कोकण कृषी विद्यापिठातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
----------
जामदा नदीवर
श्रमदानातून बंधारा
पावस ः राजापूर तालुक्यातील मिळंद येथील जामदा नदीवर सरपंच कीर्ती आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. मिळंद मुख्य योजनेच्या विहिरीची मे महिन्यातदेखील पाण्याची पातळी वाढावी तसेच गावातील विहिरींचा पाणीसाठा वाढावा, जमिनीत पाणी जास्तीत जास्त जिरवणे अशा बहुउद्देशाने बंधारा बांधणे गरजेचे होते. त्यासाठी मिळंद गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, अंकूर महिला ग्रामसंघ, सर्व पदाधिकारी, कर्मचारी, आयरे विद्यालयाचे हरितसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
-------
साखरपा जाधववाडीत
सतीमातेचा यात्रोत्सव
साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-जाधववाडी येथील प्रसिद्ध सतीमातेचा यात्रोत्सव २ जानेवारीला होणार आहे. १ जानेवारीला सतीमातेला रूपे लावून फुलांनी सजवलेल्या पालखीत बसवले जाणार असून, तिला देवाच्या सहाणेवर आणले जाईल. त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा व सायंकाळी पालखी नाचवण्यात येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सतीमातेची पालखी वाजतगाजत भक्तांच्या उपस्थितीत सतीमातेच्या मंदिरात आणली जाणार आहे. यात्रोत्सवाची सांगता रात्री करमणुकीच्या कार्यक्रमाने होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

